मुंबई बातम्या

Mumbai : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल धावणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक – News18 लोकमत

मुंबई, 29 डिसेंबर : नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक मुंबईकर हे रात्री उशीरापर्यंत बाहेर असतात. या मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनानं विशेष काळजी घेतली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून 31 डिसेंबर रोजी विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना नवीन वर्षाचे स्वागत केल्यानंतर घरी जाताना अडचण येणार नाही.पश्चिम रेल्वे 31 डिसेंबर 2022 आणि 1 जानेवारी 2023 च्या मध्यरात्री 8 विशेष लोकल ट्रेन चालवणार आहे. तर, मध्य रेल्वेही नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 4 विशेष लोकल चालविणार आहे.

सरत्या वर्षाला निरोप देतानाच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील नागरिक शहरातील पर्यटनस्थळांना भेट देत असतात. शहरात गेट वे ऑफ इंडिया, मरिन लाईन्स, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, प्रसिध्द देऊळ या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. नववर्ष जल्लोष केल्यानंतर रात्रीचा प्रवास सुखकर होण्यासाठी रात्री ते पहाटेपर्यंत आठ लोकल चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. तर मध्य रेल्वेवरदेखील रात्री उशिराने चार लोकल चालवण्यात येणार असल्याचं प्रशासनानं जाहीर केलंय.

31 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 मध्यरात्री दरम्यान धावणाऱ्या विशेष लोकल

पश्चिम रेल्वे

चर्चगेट ते विरार – रात्री 1.15

चर्चगेट ते विरार – रात्री 2.00

चर्चगेट ते विरार – रात्री 2.30

चर्चगेट ते विरार – रात्री 3.15

विरार ते चर्चगेट – रात्री 12.15

विरार ते चर्चगेट – रात्री 12.45

विरार ते चर्चगेट – रात्री 1.40

विरार ते चर्चगेट – रात्री 3.05

फक्त 30 सेंकदामध्ये तयार होणारी थंडगार आईस भेळ तुम्ही खाल्लीय? पाहा Video

मध्य रेल्वेही नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला चार विशेष लोकल चालविणार आहे. मेन लाईनवरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कल्याणसाठी ही लोकल रात्री 1.30 मिनिटांनी सुटेल आणि कल्याणला रात्री 3.00 वाजता पोहचेल. कल्याण येथून रात्री 1.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी टर्निनसला रात्री 3 वाजता पोहचेल.

हार्बर लाईन

मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.30 वाजता सुटेल आणि 2.50 वाजता पनवेल येथे पोहोचेल.

पनवेल येथून मध्यरात्री 1.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.50 वाजता पोहोचेल.

या सर्व विशेष उपनगरी ट्रेन सर्व स्थानकांवर थांबतील.  प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोव्हिड प्रोटोकालचे पालन करण्याची सूचना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMijgFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL211bWJhaS9zcGVjaWFsLWxvY2FsLXRyYWlucy1vbi13ZXN0ZXJuLWNlbnRyYWwtYW5kLWhhcmJvdXItcmFpbHdheS1kdXJpbmctbWlkbmlnaHQtb2YtMzEtZGVjZW1iZXItbXVtYmFpLTgwNjY2MC5odG1s0gGSAWh0dHBzOi8vbG9rbWF0Lm5ld3MxOC5jb20vYW1wL211bWJhaS9zcGVjaWFsLWxvY2FsLXRyYWlucy1vbi13ZXN0ZXJuLWNlbnRyYWwtYW5kLWhhcmJvdXItcmFpbHdheS1kdXJpbmctbWlkbmlnaHQtb2YtMzEtZGVjZW1iZXItbXVtYmFpLTgwNjY2MC5odG1s?oc=5