मुंबई बातम्या

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची तयारी पूर्ण… – Sakal

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांची तयारी पूर्ण…

मुंबई
sakal_logo

By

सुरक्षेसाठी ११५०० पोलिस तैनात
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : कोरोना प्रतिबंधानंतर तब्बल दोन वर्षांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज आहेत. मुंबईतील प्रमुख ठिकाणी मुंबईकरांची झुंबड उडणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख ठिकाणी ११५०० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू बीच, वांद्रे, बॅण्ड स्टॅण्ड आणि इतर प्रमुख परिसरात मोठी गर्दी जमू शकते. त्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस सज्ज आहेत.
राज्य राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पोलिस आणि क्विक रिअॅक्शन टीम (क्यूआरटी) यांच्यासह ११५०० हून अधिक कर्मचारी महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केले जातील. सुरळीत रस्ते व्यवस्थापनासाठी ३१ डिसेंबर रोजी अतिरिक्त वाहतूक पोलिसही ड्युटीवर असतील.

अशी असेल सज्जता
– पोलिस हवालदार ः १०,०००
– पोलिस अधिकारी ः १५००
– पोलिस उपायुक्त ः २५
– अतिरिक्त पोलिस आयुक्त ः ७
– एसआरपीएफ प्लाटून ः ४६
– दंगल नियंत्रण पोलिस तुकड्या ः ३
– क्विक रिअॅक्शन टीम (क्यूआरटी) ः १५

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiZGh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL3RvZGF5cy1sYXRlc3QtbWFyYXRoaS1uZXdzLW11bTIyaDEwNzkxLXR4dC1tdW1iYWktdG9kYXktMjAyMjEyMjkwMjM0NTXSAWhodHRwczovL3d3dy5lc2FrYWwuY29tL2FtcC9tdW1iYWkvdG9kYXlzLWxhdGVzdC1tYXJhdGhpLW5ld3MtbXVtMjJoMTA3OTEtdHh0LW11bWJhaS10b2RheS0yMDIyMTIyOTAyMzQ1NQ?oc=5