मुंबई बातम्या

ठाकरे गटाला आणखी एक धक्का, मुंबई पालिकेतील याचिकेबाबत मोठी अपडेट समोर – News18 लोकमत

मुंबई :  मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा फडणवीस, शिंदे सरकारविरूद्ध महाविकास आघाडी असा वाद रंगताना दिसत आहे.  मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने प्रभाग रचनेत बदल केला होता. वार्डांची संख्या वाढवून  236 इतकी करण्यात आली होती. पूर्वी वार्डाची संख्या  227 इतकी होती. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले. नव्या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देत पुन्हा एकदा वार्डांची संख्या 227 इतकीच ठेवण्याचा निर्णय घेतला. याविरोधात आता महाविका आघाडीने हायकोर्टात धाव घेतली आहे.

सुनावणीस नकार 

ठाकरे गटाचे नेते राजू पेडणेकर यांनी शिंदे, फडणवीस सरकारच्या या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती आर डी धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या द्विसदस्य खंडपीठानं नकार दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोर्ट बदलून या प्रकरणात याचिका दाखल करण्यात येणार आहे. या याचिकेबाबतची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

हेही वाचा : Yashomati Thackur : बापाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दार…? यशोमती ठाकूर यांनी शिंदे गटाला सुनावलं

नेमकं काय आहे प्रकरण? 

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारकडू मुंबईच्या वार्ड रचनेत बदल करण्यात आले होते. वार्डची संख्या वाढवण्यात आली होती. वार्डाची संख्या 227 वरून 236 इतकी करण्यात आली होती.  मात्र राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांनी महालिकास आघाडीच्या या निर्णयाला स्थगिती देत, वार्डाची संख्या पूर्वी इतकीच कायम ठेवली. शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयाला ठाकरे गटाचे नेते राजू पेडणेकर यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते.

हेही वाचा : ‘उर्मटपणा म्हणजे नेतृत्त्व नाही’, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना सणसणीत टोला

सुनावणी लांबणीवर  

यावर आज न्यायमूर्ती आर डी धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या द्विसदस्य खंडपीठानं  सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोर्ट बदलून या प्रकरणात याचिका दाखल करण्यात येणार आहे. यामुळे आता या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMilAFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL21haGFyYXNodHJhL2Fkam91cm5tZW50LW9mLXRoZS1oZWFyaW5nLW9uLXRoZS1wZXRpdGlvbi1mb3ItZm9ybWF0aW9uLW9mLW11bWJhaS1tdW5pY2lwYWwtY29ycG9yYXRpb24td2FyZC1taGRhLTc4Njg3OS5odG1s0gEA?oc=5