मुंबई बातम्या

Heavy Rain in Mumbai: मुंबई शहर, उपनगरांसह ठाण्यात मुसळधार पाऊस! अंधारून आल्याने वाहतूकही मंदावली – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : मुंबई शहर आणि परिसरात जोरदार पावसाची बॅटींग सुरू असून पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम उपनगरात चार वाजल्यापासून परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागकडून व्यक्त करण्यात आली होती. मुंबई, ठाण्यासह पुण्यात देखील परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

मुंबईतील अंधेरी भागात सायंकाळी साडेपाच वाजता प्रचंड काळे ढग जमा झाल्याने दिवसाच अंधारून आले होते. आभाळ भरून आल्याने दृश्यमानता कमी झाल्याचे पाहायला मिळाले, त्यामुळे अंधेरी आणि परिसरात वाहन चालकांना गाडीचे दिवे लावून वाहने चालवावी लागत होती, यामुळे वाहतूक मंद गतीने सुरू होती.

हेही वाचा: Maharashtra Politics: आणखी एक आमदार शिंदे गटाच्या गळाला? सुरक्षा वाढवल्याने चर्चेला उधाण

पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट

आज शुक्रवारी दुपारी तीननंतर पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पुण्याच्या विविध भागात तब्बल दीड तास चाललेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला होता. पुणे जिल्ह्याला दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

हेही वाचा: Sushma Andhare: माझं ५ वर्षांचं बाळ शिवसेनेला दत्तक; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?

Web Title: Heavy Rain In Mumbai Andheri Thane Marathi Rain Updates

Source: https://www.esakal.com/mumbai/heavy-rain-in-mumbai-andheri-thane-marathi-rain-updates-rak94