मुंबई बातम्या

Live : सिंधुदुर्गातील मल्हार पूल कोसळला; अनेक गावांचा संपर्क तुटला – Maharashtra Times

मुंबई – मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्या हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे पालघर आणि सिंधुदूर्गमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. इतकंच नाहीतर रायगड, कोल्हापूर, रत्नागिरीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

– कोकणात पावसाचा कहर सुरूच असून कनेडी येथील मल्हार पूल कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने राज्य महामार्ग बंद झाला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

-चिपळूण बचावकार्य अपडेट

१. एनडीआरएफची एक तुकडी मुंबईहून तर पुण्याहून दोन तुकड्या चिपळुणात दाखल. एकूण १३५ जवानांचा समावेश

२. नौदलाच्या पाच तुकड्या मुंबईहून रात्री पोहोचणार. एकूण ४० जवान

३. तटरक्षक दलाची एक तुकडी मुरूडहून पोहोचली. एकूण १५ जवान.

– कोल्हापुराला महापुराचा धोका; एनडीआरएफची तुकडी कोल्हापुरात दाखल

– नागपूरः मुसळधार पावसाला सुरुवात; सखल भागात पाणी साचले

कोकणात पूरस्थिती! नौदलाची रेस्क्यू टीम चिपळूणसाठी रवाना होणार

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण व वागदे येथे पाणी आल्याने वाहतूक बंद

– खेडमध्ये मुसळधार; बाजारपेठ पाण्याखाली; दुकानांत पाणी शिरले

– कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली

– सांगलीः वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर; ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरील पूल पाण्याखाली

– कर्जत ते लोणावळा (दक्षिण पूर्व घाट) दरम्यान काम सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न .

– कसारा ते इगतपुरी मार्ग आज दुपारी एकच्या सुमारास पूर्ववत; अप आणि डाउन वाहतुकीसाठी सुरक्षित

– एनडीआरएफची आणखी दोन पथकं खेड, रत्नागिरी, रायगड व महाडला रवाना

– राजापूर ::राजापूरला शहराला पूराचा धोका निर्माण झाला आहे शहरात पाणी घुसले. पाण्याचा वेग जोरात वाढल्याने शहराला चारही बाजूने पाण्याने वेढले आहे. मुंबई गोवा महामार्गवरील ब्रिटिश कालनी पूल बंद करण्याचे प्रशासनाने दिले आदेश. अर्जुना नदीने धोकक्याची पातळी ओलांडली पावसाने जन जीवन विस्कळीत अनेक तालुक्यातील मार्ग बंद झालें आहे.

– मुंबईकरांना खुशखबर! तानसा, मोडकसागर तलाव फुल्ल – मोडकसागर पहाटे ३ वाजून २४ मिनिटाने तर तानसा पहाटे ५.४८ वाजता ओव्हरफ्लो झाले आहेत. दोन्ही तलावातून मुंबईला दररोज सुमारे ९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.

– कानवे नदीवरील पुल शेणवे ते किन्हवली. पूल वाहतुकीसाठी बंद

– चिपळूण करीता NDRF च्या दोन टीम रवाना झालेले आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी वेगाने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात येत असून कोस्टल गार्डच्या मदतीने बोटी सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे. फूड पॅकेट्स व इतर मेडिकल सहकार्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. – विजय वडेट्टीवार – मदत व पुनर्वसन मंत्री

– औरंगाबाद: रेल्वे मार्गावरून मुंबई कडे जाणा-या जनशताब्दी, तपोवन सह अन्य रेल्वे रद्द करण्यात आले आहे.

– कसारा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीकडे तातडीने सुमारे शंभर बसेसची मागणी केली होती. एसटीच्या ठाणे विभागातर्फे क्षणाचाही विलंब न करता १०० गाड्यांची पूर्तता करण्यात आली. त्यानुसार २९ बसेस कल्याणसाठी ४४ बसेस इगतपुरीसाठी आणि ३० गाड्या बदलापूरसाठी सोडण्यात आल्या आहेत.

– नदी नाल्यांना पूर, पीकांचे नुकसान

– निम्न दुधना’ बारा दरवाजे उघडले, १२ हजार ४९२ क्यूसेक्स विसर्ग नदीपात्रात

– कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता, ७७ बंधारे पाण्याखाली, अनेक मार्ग बंद, २५ पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला, पंचगंगा नदीची पाणीपातळी ३६ फुटावर, अनेक घरात पाणी घुसले

– नाशिक जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात विक्रमी ९३५ मिलीमीटर पाऊस. पेठमध्ये अतिवृष्टी. ३१५ मिमी पावसाची नोंद. इगतपुरीत २४०, त्रम्बकेश्वर येथे २१६ मिमी पाऊस. सुरगाण्यातही ४५ मिलीमीटर पावसाची नोंद. जुलै महिन्याच्या सरासरीच्या ६५ टक्के पावसाची नोंद.

– अहमदनगर : नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात ६,३१० क्युसेक वेगाने पाणी सोडले, नाशिकला पाऊस सुरू असल्याने नदीच्या विसर्गामध्ये वाढ होणेची शक्यता. नगर जिल्ह्यात कोपरगाव, राहता, श्रीरामपूर व नेवासा तालुक्यातील नदी लगतच्या गावात दक्षतेच्या सूचना

– खंडाळा घाटात मुंबई पुणे लोहमार्गावर मंकीहिल ते पळसदरी दरम्यान अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्याने मुंबई पुणे. लोहमार्गावरील रेल्वे सेवा पूर्वपणे ठप्प

– कोकण रेल्वेची वाहतूक पाणी ओसरेपर्यंत ठप्प, कोकण रेल्वेच्या मार्गावरील वाहतूक चिपळूणजवळ थांबवली. चिपळूण परिसरात मुसळधार पावसाने वाशिष्ठी पुलाखाली पाण्याची पातळी वाढल्याने धोक्याची सूचना देण्यात आली आहे.

– कोकण रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे.अनेक ट्रेन स्टेशन वर रखडल्या आहेत. पाणी ओसरातच वाहतूक सुरळीत होणार अशी माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.

– मुसळधार पावसामुळे बदलापुरात रात्री 1 वाजता उल्हाननदीने धोक्याची पातळी ओलांडली, पश्र्विमेतील नदी पात्रा शेजारील अनेक भाग पाण्याखाली, घरे इमारतीतील घरात पाणी शिरले.

– अंबरनाथ, बदलापूर दरम्यान अनेक ठिकाणी रुलावरील खडी वाहून गेल्याने कर्जत ते अंबरनाथपर्यंत रेल्वे वाहतूक ठप्प सिध्देश्वर एक्स्प्रेसही पहाटे पासून बदलापूर रेल्वे स्थानकावर उभी, बदलापूर पुन्हा पुराच्या धोक्यात नागरिक धास्तावले

– परभणी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस , अनेक गावांचा तुटला संपर्क .

– लांजा : अतिवृष्टी मुळे मुंबई गोवा महामार्गावरील अंजणारी पुलावरील वाहतूक बंद

– अकोला जिल्हात मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश – अकोला जिल्ह्यातील अनेक गावामध्ये पाणीच पाणी, व्याळा ते रिधोरा दरम्यान ढगफुटी सदृश स्थीती निर्माण झाली होती. व्याळा गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे.

– मुंबईच्या किंग्ज सर्कल ब्रिजजवळ अडकला कंटेनर, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता

– कसारा घाटात दरड कोसळली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

– नाशिकमध्ये गोदावरी नदीला आला पूर, नाल्याचं पाणी शिरलं गावात

– रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू, गावांमध्ये आणि घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत

– खेडमधील जगबुडी नदीला धुवांधार पावसाने आला पूर, नजिकच्या गावांना सतर्कतेचा इशारा

– कोल्हापूरमध्येही तुफान पाऊस, अनेक नद्यांना पुराचं स्वरुप

– मुंबईत पावसाची रिपरिप सुरू, आज अतिवृष्टीचा इशारा

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-live-updates-news-todays-news-mumbai-rain-weather-update-corona-news/articleshow/84626071.cms