मुंबई बातम्या

Mumbai Crime: सफरचंदांच्या आयातीखाली अंमली पदार्थांची तस्करी; मुंबई विमानतळावर 502 कोटींचे कोकेन जप्त – Saam TV (साम टीव्ही)

जप्त करण्यात आलेले अंमलीपदार्थ दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणण्यात आले होते. आठवड्याभरापूर्वीच डीआरआयने दक्षिण आफ्रिकेतून १४७८ कोटी रुपयांच्या मेथॅम्फेटामाइन आणि कोकेनच्या तस्करी केल्याप्रकरणी केरळमधील फळ आयात करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक केली होती. त्याचाच सहभाग याप्रकरणात आढळला असून त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थांचा साठा जप्त करण्यात येणार असल्याचा विश्वास अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

Source: https://www.saamtv.com/mumbai-pune/drug-trafficking-under-apple-imports-cocaine-worth-502-crore-seized-at-mumbai-airport-ab95