मुंबई बातम्या

पुण्यातील बॉम्बे सॅपर्समध्ये सातारा सैनिक स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा – Sakal

पुण्यातील बॉम्बे सॅपर्समध्ये सातारा सैनिक स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

पुणे
sakal_logo

By

पुणे, ता. ३० : पुण्यातील बॉम्बे सॅपर्समध्ये सातारा सैनिक स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच पार पडला. सातारा येथील सैनिक शाळा ही देशातील प्रथम सैनिकी शाळा आहे. या शाळेने सैन्य दलाला अधिकारी दिले आहेत. अशा शाळेतील माजी विद्यार्थी संघटनेच्या पुणे शाखेतर्फे हा मेळावा आयोजिला केला होता.
बॉम्बे सॅपर्सच्या मेळाव्यात ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांपासून ते अगदी गेल्या वर्षी शाळेतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत सहभाग घेतला होता. मेजर जनरल अ. त. म्हैसाले यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गिरीश नेहते यांनी संस्थेचे धेय-धोरणा बद्दल माहिती दिली. पुणे शाखेचे अध्यक्ष शशिकांत धनशेट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सैनिक शाळेचे प्राध्यापक ग्रुप कॅप्टन घोरमाडे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रगतीमध्ये माजी विद्यार्थी संघटनेचे महत्त्व सांगितले.
कर्नल भास्कर बडे यांनी आभार मानले. कर्नल संग्राम यादव आणि कर्नल विक्रम नलवडे यात सहभागी झाले होते. सूत्रसंचालन अक्षय जाधव यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d95314 Txt Pune Today

Source: https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22d95314-txt-pune-today-20220830124502