मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेला भलतंच टेन्शन, समस्या सोडवण्यासाठी बजेटमध्ये 1 कोटींची तरतूद – Zee २४ तास

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडे (Mumbai Municipal Corporation) मुंबईच्या विविध भागातून भटक्या मांजरींबाबत (Stray Cats) तक्रारी येत आहेत. या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे. याबाबत मदतीसाठी आता सामाजिक संस्था आणि खाजगी संस्था भटक्या मांजरांच्या लसीकरणाच्या (Vaccination) मदतीसाठी  पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. 

मुंबई महापालिकेने चालू वर्षात या प्रकल्पासाठी रु. 2,000 प्रति मांजर निर्जंतुकीकरणाची (Sterilization) किंमत ठेवली आहे. मुंबई महापालिकेने या भटक्या मांजरींच्या लसीकरणासाठी एक कोटी रुपयांचे बजेट मंजूर केलं आहे. ही नैसर्गिक घटना आहे. कुत्रे कमी असतील तर मांजरांची संख्या वाढते अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. 

मुंबई महापालिकेने 2019 मध्ये भटक्या मांजरींचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली. हे काम देवनार इथल्या निवारा इथं आणि परळ इथल्या बॉम्बे पशुवैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रम चालवणाऱ्या डिफेन्स ऑफ अॅनिमल्स या एनजीओला देण्यात आले होते. पण बीएमसी आता या कामात आणखी एजन्सींने सहभाग व्हावे यासाठी आवाहन करत आहे.  2019 पासून आतापर्यंत केवळ 5,700 मांजरींची नसबंदी केली आहे, त्यात अनेक अडथळे आहेत.

मांजरांच्या लसीकरणातील अडथळे
सर्वप्रथम, पालिका किंवा संबंधित संस्थेला असे लोक शोधावे लागतील जे मांजरी पकडतील आणि त्यांना नसबंदीच्या ठिकाणी आणतील. यानंतर निर्जंतुकीकरणानंतर त्यांना ठेवण्यासाठी मोठे पिंजरे विकत घ्यावे लागतील. लसीकरणानंतर मांजरांना  किमान पाच दिवस निरीक्षणाखाली ठेवावे लागते. याशिवाय काही वेळा, लोक त्यांच्या निवासस्थानाजवळ नसबंदी केंद्र उभारण्यास विरोध करतात.

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/stray-cats-1-crore-provision-in-the-budget-from-mumbai-municipal-corporation/652848