मुंबई बातम्या

साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी झाडून खून, बॉम्बे रेस्टॉरंट चौकात धक्कादायक घटना – News18 लोकमत

सातारा, 2 जुलै : साताऱ्यात (Satara) आज भरदिवसा धक्कादायक घटना घडली आहे. साताऱ्याच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आज दुपारी डोक्यात गोळी घालून खून (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात आरोपीने एका व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडली. या गोळीबारात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे अज्ञात आरोपी खून करुन पळून गेला. संबंधित घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच एकच खळबळ उडाली. भर दुपारी शहरात अशाप्रकारची घटना कशी घडू शकते, आरोपींना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

संबंधित घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतक व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तसेच आरोपी नेमका कोण होता याबाबतही पोलिसांना माहिती मिळालेली नाही. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. यासाठी शहरातील कदाचित सीसीटीव्ही फुटेजही तपासले जावू शकतात. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता त्यांना बंदुकीच्या गोळीची रिकामी पुंगळी सापडल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी ती पुंगळी जप्त केली आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

महाराष्ट्र

  • पोलीस होण्याचं स्वप्न अर्धवट राहिले, सरावादरम्यान दोघांना अज्ञात वाहनाने चिरडले

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं घर अति महत्त्वाचे ठिकाण जाहीर, पोलिसांचा घराला पहारा!

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं घर अति महत्त्वाचे ठिकाण जाहीर, पोलिसांचा घराला पहारा!

  • पाणीकपातीनंतर पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, दमदार पावसानंतर धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात

    पाणीकपातीनंतर पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, दमदार पावसानंतर धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात

  • साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी झाडून खून, बॉम्बे रेस्टॉरंट चौकात धक्कादायक घटना

    साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी झाडून खून, बॉम्बे रेस्टॉरंट चौकात धक्कादायक घटना

  • LIVE Updates :  शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याच्या हॉटेलवरुन निघाले, संध्याकाळी मुंबईत दाखल होणार

    LIVE Updates : शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्याच्या हॉटेलवरुन निघाले, संध्याकाळी मुंबईत दाखल होणार

  • पंढरपूरच्या विठुरायाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, आता 24 तास मिळणार विठ्ठलाचे दर्शन

    पंढरपूरच्या विठुरायाच्या भाविकांसाठी आनंदाची बातमी, आता 24 तास मिळणार विठ्ठलाचे दर्शन

  • Amravati News : केमिस्ट हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी दिलं महत्त्वाचं अपडेट

    Amravati News : केमिस्ट हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी दिलं महत्त्वाचं अपडेट

  • अमित ठाकरेंचा मेट्रोच्या आरे कारशेडला विरोध, मनसे-भाजप आमनेसामने येणार?

    अमित ठाकरेंचा मेट्रोच्या आरे कारशेडला विरोध, मनसे-भाजप आमनेसामने येणार?

  • एकनाथ शिंदेंचं सुरतेच्या स्वारी आधीच ठरलं होतं? पडद्यामागची INSIDE STORY

    एकनाथ शिंदेंचं सुरतेच्या स्वारी आधीच ठरलं होतं? पडद्यामागची INSIDE STORY

  • विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंचा व्हीप जारी, आवाजी मतदान, कारवाईची टांगती तलवार, बंडखोरांचं काय होणार?

    विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी सुनील प्रभूंचा व्हीप जारी, आवाजी मतदान, कारवाईची टांगती तलवार, बंडखोरांचं काय होणार?

  • बीडमध्ये शिवसेनेला खिंडार, पदाधिकाऱ्यांनी सुद्धा धरली शिंदे गटाची वाट!

    बीडमध्ये शिवसेनेला खिंडार, पदाधिकाऱ्यांनी सुद्धा धरली शिंदे गटाची वाट!

महाराष्ट्र

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/satara-murder-shocking-incident-at-bombay-restaurant-chowk-man-shot-dead-mhcp-726122.html