मुंबई बातम्या

Monsoon in Mumbai : अखेर हवामान खात्याच्या अंदाज खरा ठरला, मुंबईत मान्सूनला सुरूवात, पुढचे चार दिवस पावसाचा… – News18 लोकमत

मुंबई, 11 जून : मान्सून आज (11 जून) अखेर मुंबईतही (monsoon rain in Mumbai) दाखल झाला आहे. आज डहाणू, मुंबई, ठाणे, रायगडसह महाराष्ट्रातील इतरही भागात पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. (imd alert Maharashtra rain) दरम्यान काल पासून मान्सून कोकणात आल्याने राज्यातील अनेक भागात मान्सूनच्या सरी बरसत आहेत.  (pre monsoon rain) काल पुणे, मुंबई, कोकणातील काही जिल्ह्यांसह (pune, mumbai monsoon rain) उर्वरीत महाराष्ट्रात पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान याबाबत हवामान विभागाचे अधिकारी होसाळकर यांनी ट्विट करत मुंबईत मान्सून दाखल झाल्याची माहिती दिली.

राज्यात मान्सूनने दक्षिण कोकणात जोरदार हजेरी लावली आहे. गोव्यासह कोकणातील काही भागात मान्सूनला सुरूवात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने झोडपले. मुंबई, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात काल पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याने राज्यात पुढचे दोन दिवस पावसाची शक्यता आहे.

हे ही वाचा : Nashik Rain : नाशिकमध्ये सलग दोन दिवस पावसाने दैना, एका शेतकऱ्यासह दोन बैलांचा वीज पडून मृत्यू

कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आली आहे.

राज्यात विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, या जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तसेच पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. या पावसामुळे उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पुण्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने पोलिसांचीही तारांबळ उडाली. पावसात पुणे पोलीस आयुक्तालयासमोरील झाड कोसळल्याची घटना घडली. यामुळे आयुक्तालयात 20 हून अधिक वाहने अडकली होती. 

हे ही वाचा : Rajya Sabha Election: अपक्ष आमदारांनी खरंच भाजपला मतदान केलं? संजय राऊतांच्या आरोपांवर देवंद्र भुयार यांनी म्हटलं…

पुढील दोन ते तीन दिवस लखलखाट तसेच गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र काल झालेल्या पहिल्या मान्सूनच्या दमदार हजेरीमुळे तळवडेत दुकानात पाणी शिरले. मान्सून जिल्ह्यात दाखल झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.

मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावल्याने खरिपाची पेरणी (kharif sowing) शेतकरी (farmer) सुखावला असला तरी केळी व अन्य पिकांना दणका बसल्याने काही शेतकऱ्यांना याचा जोरदार फटका बसला आहे. दरम्यान कालपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार (Nashik district heavy rain fall) पाऊस पडत आहे. विजाच्या कडकडाटाने पाऊस पडत असल्याने एका शेतकऱ्याचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे. दरम्यान आतापर्यंत नाशिकमध्ये तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

महाराष्ट्र

महाराष्ट्र

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/agriculture/at-last-the-weather-departments-prediction-came-true-the-monsoon-started-in-mumbai-sr-715769.html