मुंबई बातम्या

म्हाडा-मुंबई शहर बेटावरील २१ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर – MahaMTB

जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण

मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यंदाचे वर्षी २१ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या २१ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या १४ इमारतींचाही समावेश आहे.

यंदाचे वर्षी जाहीर केलेल्या २१ अतिधोकादायक इमारतींची यादी पुढीलप्रमाणे :

१) इमारत क्रमांक १४४, एमजीरोड,अ- ११६३ (मागील वर्षीच्या यादीतील)

२) इमारत क्रमांक ४-४ ए, नवरोजी हिल रोड क्र. १, जाली चेंबर

३) इमारत क्रमांक ५७-५९, जकेरिया मस्जिद स्ट्रीट

४) इमारत क्रमांक १०१-१११, बारा इमारत रोड (मागील वर्षीच्या यादीतील)

५) इमारत क्रमांक ७४ निझाम स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)

६) इमारत क्रमांक १६६ डी, मुंबादेवी रोड (मागील वर्षीच्या यादीतील)

७) इमारत क्रमांक २-४ ए, दुसरी भोईवाडा लेन (मागील वर्षीच्या यादीतील)

८) इमारत क्रमांक ४२, मस्जिद स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)

९) इमारत क्रमांक १४, भंडारी स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)

१०) इमारत क्रमांक ६४-६४ ए, भंडारी स्ट्रीट (मागील वर्षीच्या यादीतील)

११) इमारत क्रमांक १-३-५, संत सेना महाराज मार्ग (मागील वर्षीच्या यादीतील)

१२) इमारत क्रमांक २-४, सोराबजी संतुक लेन (मागील वर्षीच्या यादीतील)

१३) इमारत क्रमांक ३८७-३९१, बदाम वाडी, व्ही.पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)

१४) इमारत क्रमांक ३९१ डी, बदाम वाडी व्ही.पी. रोड (मागील वर्षीच्या यादीतील)

१५) इमारत क्रमांक ३१ सी व ३३ ए, आर. रांगणेकर मार्ग व १९ पुरंदरे मार्ग, गिरगांव चौपाटी (मागील वर्षीच्या यादीतील)

१६) इमारत क्रमांक १२०-१२४, शेखभाई बिल्डिंग, शिवदास चापसी मार्ग

१७) छपरा बिल्डिंग २३-३३-३३ ए, रामभाऊ भोगले मार्ग

१८) इमारत क्रमांक १०४-१०६, मेघजी बिल्डिंग, अ, ब व क विंग, शिवदास चापसी मार्ग (मागील वर्षीच्या यादीतील)

१९) इमारत क्रमांक १६०-१६८, बाप्टी रोड, उपकर क्र. ई २५-२६

२०) इमारत क्रमांक ४४-४८, ३२-३७ व ९-१२ कामाठीपुरा, ११ वी व १२ वी गल्ली, देवल बिल्डिंग, उपकर क्र. २२१८

२१) अंतिम भूखंड क्र. ७२१ व ७२४ टीपीएस – ३ विभाग, इमारत क्रमांक ४० बी व ४२८ उपकर क्रमांक ग/ उत्तर – ५०९५ (१) व ग/ उत्तर – ५१०३, आत्माराम बिल्डिंग व पेनकर चाळ

या २१ अतिधोकादायक इमारतींमध्ये ६७४ निवासी व २६६ अनिवासी असे एकूण ९२३ रहिवासी / भाडेकरू आहेत. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फेकरण्यात आलेल्या कार्यवाही नुसार १९० निवासी भाडेकरू / रहिवाशांनी स्वतःची निवार्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. तर आतापर्यंत ६९ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच ५ इमारतींत दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असल्याने या इमारतींमधील २२३ भाडेकरू/रहिवाशी यांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. तसेच १८९ निवासी भाडेकरू / रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार आहे. करिता मंडळातर्फे संक्रमण शिबिरांत त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याबाबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू / रहिवाशाना मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे व सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे जेणेकरून अपघात होऊन होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. तसेच मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास सूचित करण्यात यावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/5/27/List-of-21-most-dangerous-cess-paid-buildings-on-MHADA-Mumbai-city-island-announced.html