मुंबई बातम्या

Weather Alert : मुंबईत २ दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस, वाचा हवामान खात्याचा इशारा – Maharashtra Times

मुंबई : यंदा मान्सून (Monsoon) वेळेआधी दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. सोमवारी मान्सून अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल झाला आहे. यामुळे केरळमध्ये मान्सून चार दिवस तर मुंबईत (Mumbai) ३ दिवस आधीच मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पण यासोबतच शुक्रवारपर्यंत मुंबईमध्ये प्री-मान्सूनची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून नियोजित वेळेच्या एक आठवडा अगोदर २२ मे ऐवजी १५ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला. आता केरळमध्ये २७ मेपर्यंत आणि त्यानंतर मुंबईत ५ ते ६ जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. अशात हवामानतज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी सांगितले की, मान्सूनचा आतापर्यंत प्रवास चांगला राहिल्यामुळे २० ते २१ मे रोजी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या उंबरठ्यावर करोनाचं संकट, ठाण्यात नव्या रुग्णांची संख्या वाचलीत का?
दिनेश मिश्रा म्हणाले की, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास चांगला झाला. त्यामुळे केरळसह मुंबईत मान्सून वेळेआधी दाखल होईल. दुसरीकडे, केरळच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीसह राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

बीएमसीसमोर मोठे आव्हान

वेळेआधीच मान्सून सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यामुळे पालिकेसमोर साफसफाईचं मोठं आव्हान आहे. मान्सूनपूर्व नाल्याची सफाई अद्यापही पूर्ण झालेली नाही. बीएमसीने नाले सफाईसाठी ३१ मे ही तारीख निश्चित केली आहे. आतापर्यंत नाल्याच्या साफसफाईचे अनेक काम बाकी आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागू नये इतकंच.

मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! ‘या’ २२ दिवसांत स्वप्ननगरी तुंबण्याची शक्यता

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-weather-today-pre-monsoon-after-2-days-weather-forecast/articleshow/91635140.cms