मुंबई बातम्या

आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मुंबई हायकोर्टाचा जोरदार धक्का – Maharashtra Times

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला जोरदार धक्का दिला आहे. पवई तलाव परिसरातील सायकल आणि जॉगिंग ट्रॅकला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय. तिथे झालेले बांधकाम हे पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणारे आणि बेकायदा आहे, अशा शब्दात न्यायालयाने महापालिकेला सुनावलं आहे (Powai Lake Project).

हेही वाचा – १८५७ च्या उठावात पण देवेंद्र फडणवीसांचं योगदान असेल, आदित्य ठाकरेंचा टोला

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय काय?

पवई तलाव परिसरात सायकल ट्रॅकचे झालेले आणि नियोजित बांधकाम हे पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करणारे आणि बेकायदा आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिलाय. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने झालेले बांधकाम तात्काळ तोडून ती जागा पूर्ववत करावी, असे आदेशही हायकोर्टाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

हेही वाचा – ‘मर्सिडीज बेबी’ म्हणून हिणवणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचं चोख प्रत्युत्तर

निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्याची विनंतीही न्यायालयाने नाकारली

इतकंच नाही तर निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे, यासाठी तात्पुरती स्थगिती देण्याची पालिकेची विनंतीही हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाचा हा निर्णय आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिकेला धक्का देणारा आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bombay-high-court-slams-mumbai-mahapalika-bmc-over-powai-lake-project/articleshow/91373271.cms