मुंबई बातम्या

लेडीज स्पेशल! फक्त महिलांसाठी मुंबई महापालिकेचे लसीकरण सत्र – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील सर्व शासकीय व सार्वजनिक करोना लसीकरण केंद्रावर उद्या, सोमवारी, २७ सप्टेंबर रोजी केवळ महिलांसाठी लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळमध्ये फक्त महिलांना लसीकरण सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

२८ सप्टेंबर रोजी ९ ते दुपारी २ या पहिल्या सत्रात शिक्षक तसेच १८ वर्ष व त्यावरील वयाचे विद्यार्थी यांचे लसीकरण होईल. दोन्ही दिवशी सर्व शासकीय व महापालिका लसीकरण केद्रांवर थेट लस घेता येईल. त्यासाठी ऑनलाइन पूर्वनोंदणीची आवश्यकता नाही. सोबत ओळखपत्र, तसेच शिक्षक व विद्यार्थी यांनी शैक्षणिक संस्थांचे ओळखपत्र आवश्यक आहे. याच दिवशी दुपारी ३ ते रात्री ८ यावेळेत दुसरी मात्रा घेण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्यांचे लसीकरण होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-municipal-corporations-immunization-session-for-women-only/articleshow/86523930.cms