मुंबई बातम्या

प्रवीण दरेकरांच्या अडचणीत वाढ?; मुंबै बँक प्रकरणी मुंबई पोलिसांची नोटीस – Maharashtra Times

मुंबईः मुंबै बँक कथित घोटाळा प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व भाजप नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटिस बजावली आहे. दरेकर यांना सोमवारी ४ एप्रिल रोजी मुंबईतील रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यातत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे २० वर्ष सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावरर आहे. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे.

वाचाः Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबेना!; १३ दिवसांत ११ वेळा दर वाढले

आता या प्रकरणात प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. मुंबई पोलिसांनी दरेकर यांना सोमवारी सकाळी ११ वाजता पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

मुंबै जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही वर्गातून निवडून आले होते. मात्र, निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र घोषित करण्यात आले. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरूच ठेवली होती. दरेकर यांनी ज्या मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुंबै बँकेची निवडणूक लढविली होती त्या प्रतिज्ञा मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचे दाखवण्यात आले होते.

वाचाः राज ठाकरे हिंदुत्व व भाजपच्या अधिक जवळ?; बदलत्या भूमिकेचे पाडवा मेळाव्यात स्पष्ट संकेत

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-police-sent-a-notice-to-darekar-to-appear-for-questioning-on-monday/articleshow/90619340.cms