मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेची आता ‘मेट्रो’वर कारवाई – MahaMTB

मुंबई : मुंबई मेट्रोने २०१३ पासून ११७ कोटी रुपयांचा मालमत्त कर अद्याप भरला नसल्याचा दावा गुरुवारी (दि. २४ मार्च) मुंबई महापालिकेने केला आहे. त्यामुळे पालिकेकडून डीएन नगर आणि अंधेरी वेस्ट या स्थानकातील मेट्रो अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. प्रशासनाने यापूर्वी मुंबई मेट्रो-१ च्या ११ मालमत्तांना नोटीस पाठवली असून यात आणखी आठ मेट्रो स्थानकांचा समावेश असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

‘मुंबई मेट्रोने आजपर्यंत ११७ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला असून २१ दिवसांत कराची रक्कम भरण्याचे निर्देश यापूर्वी दिलेल्या नोटीसमध्ये देण्यात आले होते. तसे न केल्यास पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशाराही दिला होता.’, असा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

Source: https://www.mahamtb.com/Encyc/2022/3/24/BMC-now-takes-action-on-Mumbai-Metro.html