मुंबई बातम्या

Mumbai COVID 19 Cases Updates : मुंबई करोनामुक्तीकडे; गेल्या २४ तासांत शून्य मृत्यूची नोंद – Maharashtra Times

मुंबई: मुंबईतील दैनंदिन करोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ५४ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर एकाही करोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

मुंबईत करोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. मुंबई महापालिकेने आज, गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ५४ नवीन करोनाबाधितांचे निदान झाले आहे. तर शून्य करोना मृत्यूची नोंद झाली आहे. तर याच कालावधीत ७३ करोना रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या १०,५७,७१५ इतकी झाली आहे. तर करोना मृत्यूंची एकूण संख्या १६६९३ इतकी झाली आहे.

ठाकरे सरकारची मोठी घोषणा; सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत ३०० घरे
imagestorm in ratnagiri: रत्नागिरीला वादळाचा मोठा तडाखा; घरे, गोठयांसह आंबा, काजू, नारळाच्या झाडांचे नुकसान

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ४६ करोनाबाधितांची नोंद झाली होती. त्यात आज किंचित वाढ झाली असून, आज, गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, ५४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत शून्य करोनामृत्यूंची नोंद झाली आहे. सलग आठव्या दिवशी शून्य करोना मृत्यूंची नोंद झाली आहे.

आतापर्यंत १०,३७,८७९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही २५८ इतकी आहे. दुपटीचा दर हा २१८६५ दिवसांवर पोहोचला आहे. तर कोविड वाढीचा दर हा १७ ते २३ मार्चदरम्यान ०.००३ टक्के इतका आहे.

imageDevendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांकडून ठाकरे सरकारची कोंडी; सभागृहात मांडली करोना काळातील भ्रष्टाचाराची कुंडली

धारावीत दोन वर्षांनंतर प्रथमच सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर

मुंबईतील धारावीत करोना रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत होते. मात्र, आता धारावी करोनामुक्त झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. धारावी परिसरात सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. दोन वर्षांनंतर म्हणजेच १ एप्रिल २०२० नंतर प्रथमच सक्रिय रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. धारावीत एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ८६५२ इतकी आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या शून्य आहे. दादरमध्ये सक्रिय रुग्णसंख्या एक आहे. तर माहीममध्ये ९ सक्रिय रुग्ण आहेत.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-covid-19-cases-live-updates-city-records-new-54-corona-cases-today-and-zero-deaths/articleshow/90424978.cms