मुंबई बातम्या

Coronavirus in Mumbai : मुंबईतील ४ जम्बो कोविड सेंटर अखेर बंद, अखेरच्या दिवशी… – Maharashtra Times

मुंबई: मुंबईसह राज्यातील करोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मुंबईत करोना लाट पूर्णपणे नियंत्रणात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यानंतर मुंबईतील ९ पैकी चार जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता मुलुंडमधील जम्बो कोविड सेंटरमधील अखेरच्या तीन रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर हे सेंटरही बंद करण्यात आले आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या घटली आहे. करोनाची तिसरी लाट नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील ९ पैकी ४ जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलुंडच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये अखेरच्या तीन रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. त्यानंतर हे सेंटर बंद करण्यात आले आहे. तीन रुग्णांना या सेंटरमधील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून निरोप दिला आहे. येत्या दोन दिवसांत हे कोविड सेंटर पूर्णपणे बंद केले जाईल. आतापर्यंत या सेंटरमध्ये एकूण साडेचौदा हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले. गेली दोन वर्षे या सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना अविरत सेवा दिली. त्यामुळे अखेरच्या दिवशी या सेंटरमध्ये जवळपास दोनशे कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. आता हे सेंटर पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

coronavirus update: करोना: राज्यात आज हजाराच्या खाली नवे रुग्ण; तर, ६२ ओमिक्रॉन रुग्णांचे निदान
imagecoronavirus in mumbai: मोठा दिलासा! मुंबईत फेब्रुवारी महिन्यात सहाव्यांदा शून्य मृत्युची नोंद

अखेरच्या दिवशी मुलुंडच्या या जम्बो सेंटरचा मटा ऑनलाइनकडून आढावा घेण्यात आला. येथील डॉक्टरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन वर्षांपूर्वी हे सेंटर उभारलं गेलं. येथील प्रत्येकानं रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. महामारीच्या काळात रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली याचा आनंद तर आहेच. सगळ्यांनी आता काळजी घ्यावी. करोना नियंत्रणात आला आहे. पण करोना अजून संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे, लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले.

दरम्यान, मुंबईत रुग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या १० लाख ५५ हजार २८९ इतकी आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत रुग्णाची शून्य नोंद झाली आहे. आजपर्यंत मुंबईत दगावलेल्या रुग्णांची एकूण मृत्यू संख्या १६ हजार ६९१ आहे.

imageडोकेदुखीने मुंबईकर हैराण; डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-in-mumbai-4-jumbo-covid-19-centre-shut-down-by-bmc/articleshow/89848877.cms