मुंबई बातम्या

विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी केंद्राकडून प्रयत्न, मुंबईत थेट काँग्रेस-भाजप आमनेसामने – Maharashtra Times

मुंबई : देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने इस्रायली पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर केल्याचा आरोप करीत मुंबई युवक काँग्रेसने बुधवारी आक्रमक पवित्रा घेतला. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते दादर येथील भाजप कार्यालयाकडे कूच करीत असल्याचे लक्षात येताच भाजप कार्यकर्तेही रस्त्यावर उतरल्याने दादर परिसरात तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजप कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दादर स्थानकाजवळच रोखून धरले. त्यानंतर भाजप नेत्यांनी या आंदोलकांना गाठण्याचा प्रयत्न केला. भाजप आमदार प्रसाद लाड, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर हे कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरले होते.
शिक्षणाधिकाऱ्याला एक लाखाचा दंड, कोर्टाचा अवमान भोवला!
भाजप नेत्यांच्या आक्रमक पवित्र्याची कुणकुण लागताच दादर, माहीम आणि वडाळा भागातील पदाधिकारी, कार्यकर्तेही भाजप कार्यालयाबाहेर जमा झाले व तेही काँग्रेस कार्यकर्ते जमा असलेल्या आंदोलनस्थळी जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. अखेरीस पोलिसांनी दोन्ही बाजूंचे नेते, पदाधिकाऱ्यांना आपापल्या जागी रोखून धरले. झिशान सिद्दिकी यांच्यासह प्रसाद लाड आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलिसांनी परिस्थितीवर नियत्रंण मिळवले.

imageमुंबईतील बैठकीत मनसेचा अ‍ॅक्शन प्लॅन ठरला, निवडणुकांसाठी राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, म्हणाले..

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/congress-bjp-face-to-face-in-mumbai/articleshow/89311037.cms