मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेला मृत्यूदर रोखण्यात यश – Sakal

मुंबई महापालिकेला मृत्यूदर रोखण्यात यश

मुंबई
sakal_logo

By

मुंबई – मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal) दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत मृत्यूदर (Death Rate) रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश (Success) आले आहे. कारण, जगात जेवढ्या प्रमाणात मृत्यू झालेत त्याच्या तुलनेत लोकसंख्या (Population) जास्त असूनही मुंबई महानगर पालिकेने मृत्यू नियंत्रणात ठेवले आहेत.

मुंबईत 21 डिसेंबरपासून तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. 21 डिसेंबर 2021 ते 2 फेब्रुवारी 2022 पर्यंत एकूण 275 मृत्यूंची मुंबईत नोंद झाली आहेत. म्हणजेच एका दिवसांत सरासरी 6 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तर, दुसऱ्या लाटेत मुंबईत कोविड रुग्णसंख्या जास्त असली तरी फक्त 3, 484 मृत्यू नोंदले गेले होते.

हेही वाचा: लग्नाला ५० वऱ्हाडी; इतरांचा घरातूनच थाट!

दुसरी लाट मुंबईत 10 फेब्रुवारी 2021 ते 31 मे 2021 अशी शंभर दिवस सुरु होती. त्यात 3 लाख 93 हजार कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आणि एकूण मृत्यूचा आकडा 3484 म्हणजे मृत्यूची टक्केवारी ही जगात सर्वात कमी होती. याचे प्रमाण 0.8 टक्के एवढे सर्वात कमी होते. तर, 21 डिसेंबर 2021 पासून सुरु झालेल्या तिसऱ्या लाटेत फक्त 44 दिवसांत 2 लाख 81 हजार पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. आणि फक्त 275 मृत्यू झाले आहेत. त्यामुळे, सरासरी प्रतिदिवस सहा मृत्यू झाले असून मृत्यूदर रोखण्यात पालिकेने उत्तम काम केले असे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे.

तिसऱ्या लाटेतील मृत्यूचा आकडा हा एक अंकी आहे, यात पालिकेने अत्यंत महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे असेही चहल यांनी सांगितले.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-municipal-corporation-succeeds-in-preventing-death-rate-pjp78