मुंबई बातम्या

मुंबई : ताडदेवमध्ये इमारतीला आग, 7 जणांचा मृत्यू, 18 जखमी| Mumbai Fire – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई : ताडदेव परिसरातील नाना चौक गवालीया टॅंक येथील कमला इमारतीला (kamala building) आग लागली. माहितीनुसार ही आग आज (ता.२२) सकाळी साडेसातच्या सुमारास लागली. इमारत 20 मजली इमारत असून याच्या 18 व्या मजल्यावर ही आग लागलीय. घटनास्थळी अग्निशमन दलाचे सहकारी पोहचले असून आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहे, दरम्यान या दुर्घटनेत मृत्यूचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

आगीत 18 जण जखमी, 7 जणांचा मृत्यू भाटिया रुग्णालयात दाखल

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी पावणे आठच्या सुमारास आग लेव्हल 3 ची होती. या आगीत 18 जण जखमी झाले असून त्यांना भाटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. आगीच्या ठिकाणी 13 फायर इंजिन व 7 जंबो टँकर द्वारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने माहिती दिली आहे.

नाना चौक कमला इमारत आगीत 7 जणांचा मृत्यू

नायर रुग्णालयात 5 मृत्यू

कस्तुरबा रुग्णालयात 1 मृत्यू

भाटिया रुग्णालयात 1 मृत्यू

२ रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यास नकार

कमला इमारत आग दुर्घटनेत 18 जण जखमी झाले आहेत . या जखमींना भाटिया रुग्णलयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय 18 पैकी ३ जण अत्यवस्थ आहेत. जखमींना वाचवल्या नंतर ओकहार्ड आणि रिलायन्स रुग्णालयात घेऊन गेले असता, या दोन्ही रुग्णालयांनी जखमींवर उपचार करण्यास नकार दिला. त्यामुळे भाटिया रुग्णालयातच या जखमींना दाखल करावं लागलंय. त्यामुळे नकार देणाऱ्या या दोन्ही रुग्णालयावर कारवाही करण्यास आयुक्तांना आपण सांगणार असल्याचं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

हेही वाचा: पंतप्रधान मोदी आज देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार

हेही वाचा: प्रचारासाठी उत्तर प्रदेशात भाजपची मोठी फौज, IT सेलही सज्ज

Source: https://www.esakal.com/mumbai/fire-at-kamala-building-mumbai-marathi-news-jpd93