मुंबई बातम्या

Mumbai Crime : अंधेरीत डान्स बारवर मुंबई पोलिसांचा छापा, तळघरातून 17 मुलींची सुटका – TV9 Marathi

बार गर्ल्सना बारच्या तळघरात ठेवण्यात आले होते. तेथून 17 मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. कोरोना काळातही या डान्सबारमध्ये खुलेआम नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार एका एनजीओच्या वतीने करण्यात आली होती.

अंधेरीत डान्स बारवर मुंबई पोलिसांचा छापा

मुंबई : अंधेरीतील दीपा डान्स बारवर छापा टाकून पोलिसांनी 17 मुलींची सुटका केली. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने ही कारवाई केली. याप्रकरणी बारच्या मॅनेजर आणि कॅशियरसह तीन कर्मचाऱ्यांविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका एनजीओच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. यादरम्यान स्थानिक पोलीस ठाण्याच्या पोलिसांना या छाप्याची माहितीही नव्हती.

नियमाविरुद्ध सुरु होता बार

बार गर्ल्सना बारच्या तळघरात ठेवण्यात आले होते. तेथून 17 मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे. कोरोना काळातही या डान्सबारमध्ये खुलेआम नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार एका एनजीओच्या वतीने करण्यात आली होती. पोलिसांच्या नियमानुसार बार डान्सर्स बारमध्ये खुलेआम डान्स करतात आणि दररोज शेकडो लोक या बार डान्सर्सवर लाखो रुपये खर्च करायला येतात. हा बार नियमाविरुद्ध रात्रभर सुरु असायचा. मात्र, स्थानिक अंधेरी पोलिसांना याची माहितीही मिळाली नव्हती. पोलिसांच्या समाजसेवा शाखेचे पथक शनिवारी रात्री 11.30 ते 12.30 च्या सुमारास छापा मारण्यासाठी पोहोचले.

मेकअप रुममधील आरशाच्या मागे गुप्त रुममधून मुलींना घेतले ताब्यात

मुंबईत डान्सबारवरील बंदी उठवण्यात आल्यानंतर केवळ चार मुलींनाच काम करण्याची मुभा असली तरी येथे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली 40 हून अधिक मुलींकडून नाचवण्यात येत होते. पोलिसांच्या छाप्याला घाबरून या मुली तळघरातील गुप्त खोलीत लपल्या होत्या. जेव्हा संपूर्ण पोलीस दल आणि एनजीओ बारमध्ये पोहोचले, तेव्हा सर्वजण घाबरले आणि इतक्यात एनजीओच्या टीमचे लोक मेकअप रुममध्ये गेले, तिथे त्यांची नजर भिंतीवर लावलेल्या आरशावर पडली. हा आरसा सामान्य आरशापेक्षा खूप मोठा असल्याने एनजीओच्या लोकांना संशयास्पद वाटले.

एनजीओच्या टीमने हा आरसा हटवला असता आरशाच्या मागे असलेली गुप्त खोली पोलिसांना दिसली. या खोलीत जाऊन पाहिले असता 17 बार बाला येथे लपून बसल्या होत्या. या सर्व बार बालांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुप्त तळघरात एसी, बेड अशा सर्व सुविधा होत्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले(Mumbai Police raids Andheri dance bar, 17 girls released from basement)

[embedded content]

इतर बातम्या

Mumbai Lift Accident | मुंबईत दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, पाच जण गंभीर जखमी

Rickshaw Accident | धावती रिक्षा उलटून दोन वेळा पलटी, नांदेडमध्ये अपघात, 9 विद्यार्थिनी जखमी

Source: https://www.tv9marathi.com/crime/mumbai-crime/mumbai-police-raids-andheri-dance-bar-17-girls-released-from-basement-595054.html