मुंबई बातम्या

मुंबई : मांडूळाची अवैध विक्री करणाऱ्या तिघांना अटक | Mumbai crime update – Sakal

मुंबई : गोरेगाव पूर्व (Goregaon east) येथील इन्फिनिटी आयटी पार्क (infinity IT park) मध्ये वन्यजीव कायद्यानुसार (Wildlife Act) प्रतिबंधित असलेल्या मांडूळ सर्पाची अवैध विक्री (snakes illegal selling) करण्यासाठी आलेल्या तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरो (पश्चिम विभाग) नवी मुंबई व वनक्षेत्रपाल (forest authorities) यांच्याकडून ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा: मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेत दक्षता जनजागृती आठवडा सुरू

मांडूळ सर्प वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार परिशिष्ट 4 मध्ये संरक्षित आहे. मात्र तरी देखील या सर्पाची अवैध विक्री सुरू असते. अशीच विक्री करण्यासाठी शिवसाई प्रकल्प गोरेगाव येथे पान दुकान चालविणारा रहीम अजाज अहमद खान (48), सांताकृझ येथे राहणारा व चित्रपटात ड्रेस टेक्नीशियन म्हणून काम करणारा सुभाष सोमलाल पवार (62) आणि गोरेगाव मध्ये राहणारा व शूटिंग चित्रपट निर्मिती संबंधित काम करणारा वसीउल्ला मोहम्मद सफी राय (45) हे गोरेगाव पूर्वच्या इन्फिनिटी आयटी पार्क मध्ये पोहोचले.

मात्र हे तीन जण 2 मांडूळ सर्पाची विक्री करण्यास येणार असल्याची माहिती वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्यूरो (पश्चिम विभाग) नवी मुंबई व वनक्षेत्रपाल यांना मिळाली. आणि सापळा लावून या तिघांना ताब्यात घेण्यात आले. तिन्ही आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“गुन्ह्यात जप्त केलेल्या सापांची वैद्यकीय तपासणी केली आहे. सर्पांना इजा झालेली नाही. त्यामुळे लवकरच त्यांना निसर्गवासात सोडले जाईल. “

-वर्षा आर. खरमाटे (वनक्षेत्रपाल)

“मांडूळ – दुतोंड्या साप या नावाने सर्वपरिचित असलेला हा बिनविषारी साप आहे. हे साप तस्करी करून आणणाऱ्या अनेक टोळ्या आहेत. अशा टोळ्यांची काही माहिती मिळाल्यास आम्हाला संपर्क करावा.”

– सुनिष सुब्रमण्यन कुंजु (मानद वन्यजीव रक्षक)

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-crime-update-snakes-illegal-selling-three-culprit-arrested-wildlife-act-forest-authorities-nss91