मुंबई बातम्या

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोंडी, लोणावळ्यात अपघात झाल्याने वाहनांच्या रांगा – Maharashtra Times

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. गाडीच्या लांबच-लांबा रांगा लागल्या असून अत्यंत संथगतीने वाहनं पुढे सरकत आहेत. विकेंड असल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक हळूहळू वाढू लागल्याने घाटात ट्रॅफिक कोंडी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळयाजवळ स्कॉर्पिओला अपघात झाला आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हीदेखील पुण्याच्या दिशेने निघाला असाल तर आज ट्रॅफिकचा अंदाज घेऊन निघा.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-pune-expressway-traffic-today/articleshow/91678920.cms