मुंबई बातम्या

‘बॉम्बे’ नव्हे, आता ‘मुंबई’ आर्ट सोसायटी, वार्षिक सर्वसाधारण सभेत नामांतराची घोषणा – Saamana

ऐतिहासिक ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे नामकरण आता ‘मुंबई आर्ट सोसायटी’ असे करण्यात आले आहे. सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अखेर एकमताने याबाबत घोषणा करण्यात आली आहे. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे नाव ‘मुंबई आर्ट सोसायटी’ करावे अशी मागणी कला आणि सामाजिक क्षेत्रातून गेली अनेक वर्षे सातत्याने होत होती. अखेर या मागणीला आता यश आले आहे.

सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले, ‘प्रदर्शनं करणं व कलादालनं चालवणं हे कलावंतांना व्यासपीठ मिळण्यासाठी आवश्यक आहेच, सोसायटी ते करत राहीलच. पण याहीपलीकडे एक कलासंस्था म्हणून सोसायटीला बरंच काही करायचं आहे. कलावंत व कलारसिक यामधला संवाद हरवत चाललाय. तो संवाद सुरू करून, अखंड कसा राहील यावर लक्ष द्यायची गरज आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील पाच वर्षांसाठी सोसायटीच्या नवीन कार्यकारणीची निवडदेखील यावेळी झाली. राजेंद्र पाटील यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी शिल्पकार चंद्रजित यादव यांची निवड झाली आहे.







Source: https://www.saamana.com/bombay-art-society-name-changed-as-mumbai/