मुंबई बातम्या

आगरकर पाठोपाठ रोहित-रहाणेही ‘बॉम्बे ड?… – Maha Sports

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि मर्यादित षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या नावे अनेक मोठ्यामोठ्या विक्रमांची नोंद आहे. या दोन्ही क्रिकेटपटूंनी असे काही विक्रम केले आहेत, ज्यांच्यावर केवळ त्यांचीच मोहोर आहे. तसेच या मुंबईकर क्रिकेटपटूंच्या नावे एका नको असलेल्या विक्रमाची देखील नोंद आहे. ज्याची तुलना ‘बॉम्बे डक’ अजित आगरकर सोबत केली जाते.काय आहे रोहित आणि रहाणेचे बॉम्बे डक कनेक्शन? चला जाणून घेऊया.

बॉम्बे डक नेमकं आहे तरी काय? 

अनेकांना बॉम्बे डक म्हटलं तर, हा एक माश्याच्या प्रकार आहे असे वाटेल. परंतु क्रिकेटमध्ये अजित आगरकरला बॉम्बे डक या नावाने ओळखले जाते. तर १९९० मध्ये अजित आगरकरने भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याने आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच डेनिस लिलींचा सर्वात जलद ५० गडी बाद करण्याचा विक्रम मोडून काढला होता. त्यानंतर १९९९-२००० मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला कसोटी मालिकेत ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला.

या मालिकेत अजित आगरकर भारतीय संघाकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. त्याने ११ गडी बाद केले होते. परंतु फलंदाजीमध्ये त्याने असा कारनामा केला होता जो आजवर कोणाला ही करता आला नव्हता. तो ३ कसोटी सामन्यातील ६ डावात ५ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता.त्यानंतर जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ भारतीय दौऱ्यावर आला होता.त्यावेळी देखील तो सलग दोन वेळेस शून्यावर बाद झाला होता. यासह सलग ७ डावात शून्यावर बाद झाल्यामुळे त्याचे ‘बॉम्बे डक’ हे नाव पडले.

काय आहे रहाणे – रोहितचे बॉम्बे डक कनेक्शन?

अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या दोघांनीही अजित आगरकर सोबत मुंबई संघासाठी क्रिकेट खेळले आहे. अजित आगरकरच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्या नावे आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होण्याचा विक्रम आहे. रोहित शर्माने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात डेक्कन चार्जर्स संघाकडून केली होती.त्यानंतर त्याला मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद मिळाले. तर, अजिंक्य रहाणेने आयपीएल कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्स संघाकडून केली होती. त्यानंतर त्याने राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सूपरजायंट्स आणि आता तो दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे.

रोहित शर्माने आयपीएल स्पर्धेत अनेक विक्रम केले आहेत. परंतु, सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ५ व्या स्थानी आहे.तो १३ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. तर अजिंक्य रहाणे देखील १३ वेळेस शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होणारे फलंदाज

१३ वेळेस – हरभजन सिंग

१३ वेळेस – पार्थिव पटेल

१३ वेळेस – अजिंक्य रहाणे*

१३ वेळेस – अंबाती रायुडू

१३ वेळेस – रोहित शर्मा*

Source: https://mahasports.in/rohit-sharma-ajinkya-rahane-sharmaajit-agarkar-and-bombay-duck-connection/