मुंबई बातम्या

मुंबई मनपाचा सोशल मीडिया सांभाळा, तगडी कमाई करा! – TV9 Marathi

हायटेक कारभार सुरु करणाऱ्या मुंबई महापालिकेने (BMC) सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारशी संबंधित उपक्रम असलेल्या महाआयटीद्वारे मनुष्यबळ सेवा घेतली होती. आता पुढील एक वर्षासाठी नवीन संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे.

बीएमसी

मुंबई : मुंबई महापालिकेसाठी (Mumbai Municipal Corporation) सोशल मीडिया (Social Media) हाताळण्यासाठी नवीन संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे. हायटेक कारभार सुरु करणाऱ्या मुंबई महापालिकेने (BMC) सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारशी संबंधित उपक्रम असलेल्या महाआयटीद्वारे मनुष्यबळ सेवा घेतली होती. आता पुढील एक वर्षासाठी नवीन संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे. यासाठी नुकत्याच निविदा मागविण्यात आल्या आहेत.

महापालिकेने मुख्य ट्विटर अकाऊंट तसंच सर्व विभागांशी संबंधित 24 ट्विटर खाती दोन वर्षांपूर्वी सुरू केली. पालिका प्रशासनाने सोशल मीडिया हाताळण्यासाठी नव्याने निविदा मागविली आहे. तर सध्या कार्यरत असलेल्या संस्थेला दोन कोटी 85 हजार रुपये मानधन देण्यात आले आहे. या संस्थेची मुदत जुलै 2022 रोजी संपणार होती.

मुख्य ट्विटर हॅण्डलसह ट्विटर खात्यांवर नागरिकांना तक्रार करता यावी, यासाठी महापालिकेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार रस्त्यावर पडलेले खड्डे, न उचललेला कचरा, भंगार साहित्य, अनधिकृत होर्डिंग अशा स्वरूपाच्या असंख्य तक्रारी या खात्यांवर करता येतात.

मुंबई महापालिका निवडणूक 

ठाकरे सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल.   बहुप्रतीक्षित आणि शिवसेना-भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या बीएमसी निवडणुकीकडे (BMC Election 2021) अवघ्या देशाचं लक्ष आहे. पुढील वर्शी या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका आहे. साहजिकच या महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या खिशात ठेवण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरु असते. बीएमसी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना – 97
भाजप – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 8
समाजवादी पक्ष – 6
मनसे – 1
एमआयएम – 1
अभासे – 1

काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र की स्वतंत्र?

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा केला जात होता. मात्र मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर येताच भाई जगताप यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला होता. तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. थेट आघाडीऐवजी काँग्रेस आणि सेना-राष्ट्रवादी यांच्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. (BMC Election Election Commissioner)

भाजपचे मिशन मुंबई

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यातील इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेची घसरण झाली असली तरी आजवर सेनेचा मुंबई महानगरपालिकेचा किल्ला अभेद्य राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा एल्गार केला.

संबंधित बातम्या  

महापालिका निवडणूक 2022 : मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत!

BMC Election 2021 | मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलणार? निवडणूक आयोगासोबत बैठक

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mumbai-municipal-corporation-bmc-social-media-tender-to-appoint-agency-for-communications-541136.html