मुंबई बातम्या

Mumbai Vaccination: एक लाखाहून अधिक महिलांचं एका दिवसात लसीकरण, मुंबई महिला लसीकरण विशेष सत्राला चांगला प्र… – News18 लोकमत

मुंबई, 18 सप्टेंबर: कोविड-19 प्रतिबंध लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (Bombay Municipal Corporation) वतीने शुक्रवारी म्हणजेच काल (17 सप्टेंबर 2021) मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका (BMC) कोविड-19 (Covid 19) लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी (Women) राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवण्यात आलं. त्यानुसार या सत्रात एकूण 1 लाख 27 हजार 351 महिलांना शुक्रवारी लस देण्यात आली. यात महिलांना थेट येऊन (Walk In) कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा घेण्याची मुभा देण्यात आली होती.

काल झालेल्या महिला लसीकरण विशेष सत्रात एकूण 1 लाख 27 हजार 351 लसी दिल्या गेल्या. ज्यात मुंबईत महानगरपालिका, शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांचा समावेश होता. तर त्यापैकी महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रावर एकूण 1 लाख 07 हजार 934 लसी देण्यात आल्या.

शुक्रवारी फक्त महिलांसाठी राखीव असं विशेष कोविड लसीकरण सत्र सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.30 या वेळेत राबवण्यात आलं होतं. या विशेष सत्रामध्ये मुंबई पालिकेच्या योजनेतून मुंबईतील सर्व 227 प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयं आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येऊन (Walk In) महिलांना कोविड लस घेता येईल असं व्यवस्थापन केलं होतं.

मुंबईकरांमध्ये 86.64% नागरिकांमध्ये Corona Antibodies

मुंबई महापालिकेने पाचवा सीरो सर्व्हे रिपोर्ट जारी केला आहे. 24 वॉर्डमधील 8,600 रक्ताचे नमुने घेण्यात आले. ज्यामध्ये 86.64% नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज म्हणजे प्रतिपिंडे सापडली आहेत. कोरोना लशीचे दोन्ही किंवा एक डोस घेतलेल्या 90.26% नागरिकांमध्ये अँटिबॉडीज आहेत. लसीकरण न झालेल्या नागरिकांपैकी 79.86 टक्के नागरिकांमध्येसुद्धा प्रतिपिंडे आढळलेली आहेत.

सचिन वाझेनं अनिल देशमुखांच्या सचिवाकडे दिल्या होत्या पैशांनी भरलेल्या 16 बॅगा, आरोपपत्रात खुलासा

मुंबईला हर्ड इम्युनिटी मिळाली?

मुंबईतील 86.64% नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज म्हणजे प्रतिपिंडे सापडली आहेत. कोरोनासाठी आवश्यक असलेल्या हर्ड इम्युनिटीचं प्रमाण मुंबईने गाठलं आहे. त्यामुळे मुंबईला हर्ड इम्युनिटी मिळाली का असा प्रश्न उपस्थित होतो.

मुंबईतून एक संशयित दहशतवादी ताब्यात, ATS ची मोठी कारवाई

 इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, कोरोनाविरोधातील इम्युनिटी दोन मार्गांनी मिळते, एक म्हणजे आधी कोरोना संसर्ग झाला असेल तर आणि दुसरं म्हणजे कोरोना लसीकरण. पण ही इम्युनिटी साधारणपणे सहा महिन्यांपर्यंत टिकू शकत नाही. त्यामुळे मुंबईत 86.64% नागरिकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज सापडल्या असल्या तरी ती काही कालावधीत कमी होऊ शकते आणि इम्युनिटी कमी झालेल्यांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो.

Source: https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-vaccination-1-lakh-27-thousand-women-vaccinated-with-covid-vaccine-in-special-session-women-vaccination-mhpv-605995.html