मुंबई बातम्या

बॉम्बे आर्ट सोसायटीचे नामांतर मुंबई आर्ट सोसायटी करा – मुख्यमंत्री – Times Now Marathi

बॉम्बे आर्ट सोसायटीचे नामांतर मुंबई आर्ट सोसायटी करा – मुख्यमंत्री& 

थोडं पण कामाचं

  • बॉम्बे आर्ट सोसायटीचे नामांतर मुंबई आर्ट सोसायटी करा – मुख्यमंत्री
  • महाराष्ट्रात स्वतंत्र कला विद्यापीठ असावे अशी आपली इच्छा – मुख्यमंत्री
  • कला क्षेत्रात योगदान देणाऱ्यांनी केलेल्या सूचना आणि मागण्या यांच्याबाबत योग्य ते निर्णय लवकरच घेऊ – मुख्यमंत्री

मुंबईः दि बॉम्बे आर्ट सोसायटीचे नाव मुंबई आर्ट सोसायटी असे करावे; असे ७५व्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ते दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कार्यक्रमात बोलत होते. Rename Bombay Art Society to Mumbai Art Society

महाराष्ट्रात स्वतंत्र कला विद्यापीठ असावे अशी आपली इच्छा आहे. या विद्यापीठासाठी बॉम्बे आर्ट सोसायटीने पुढाकार घ्यावा; असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते ‘दि बॉम्बे आर्ट सोसायटी’ आयोजित ‘कलर्स ऑफ इंडिपेंडन्स: ७५ इयर्स ऑफ आर्ट’ या ऑनलाईन कला प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. कला क्षेत्रात योगदान देणाऱ्यांनी केलेल्या सूचना आणि मागण्या यांच्याबाबत योग्य ते निर्णय लवकरच घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. THE BOMBAY ART SOCIETY presenting An online Exhibition from 15 August to 30 Dec 2021

‘दि बॉम्बे आर्ट सोसायटी’ आयोजित ‘कलर्स ऑफ इंडिपेंडन्स: ७५ इयर्स ऑफ आर्ट’ या ऑनलाईन कला प्रदर्शनात चित्र, शिल्प, मुद्राचित्र, फोटोग्राफी, व्हिडिओ इन्स्टॉलेशन या पाच कलाप्रकारातील एक हजार ६४५ कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत. हे प्रदर्शन १५ ऑगस्ट ते ३० डिसेंबर २०२१ या काळात ऑनलाईन पद्धतीने बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वेबसाइटवर बघता येईल.

बातमीची भावकी

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/rename-bombay-art-society-to-mumbai-art-society/358603