मुंबई बातम्या

मुंबईत १७ ते २१ मे दरम्यान पाणीकपात – Times Now Marathi

मुंबईत १७ ते २१ मे दरम्यान पाणीकपात& 

थोडं पण कामाचं

  • मुंबईत १७ ते २१ मे दरम्यान पाणीकपात
  • पिसे बंधाऱ्यातील न्यूमॅटिक झडपांची दुरुस्ती केली जाणार
  • नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा

मुंबईः मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यातील न्यूमॅटिक झडपांची दुरुस्ती केली जाणार आहे. या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबईत १७ ते २१ मे या कालावधीत दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. water cut in mumbai from 17 to 21 may 2021

भातसा धरणातून पिसे बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. पिसे बंधाऱ्यातून पाणी शुद्धीकरण केंद्रात आणले जाते. जलशुद्धीकरण केंद्रात पाण्यावर प्रक्रिया केली जाते. पिण्यायोग्य केलेले हे पाणी मुंबईला पुरवले जाते. या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिसे बंधाऱ्यातील न्यूमॅटिक झडपांच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. दुरुस्तीच्या कामाचा कार्यादेश (work order) निघाला आहे. 

पिसे बंधाऱ्यातील न्यूमॅटिक झडपांची दुरुस्ती होणार असल्यामुळे १७ ते २१ मे या कालावधीत मुंबईत दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन मुंबई मनपाने केले आहे.

बातमीची भावकी

उन्हाळयाचे दिवस असल्यामुळे मुंबईची पाण्याची मागणी ४२०० दशलक्ष लिटर एवढी आहे. पण मुंबई मनपा ३७०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करत आहे.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/water-cut-in-mumbai-from-17-to-21-may/346421