मुंबई बातम्या

मध्य रेल्वेने ‘या’ कारणामुळे मुंबई-पुण्यातून जाणाऱ्या १० ट्रेन केल्या रद्द – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • राज्यात करोनाचा उद्रेक झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत.
  • या स्थितीचा परिणाम मुंबई बाहेर जाणाऱ्या आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मुंबईत येणाऱ्या ट्रेनच्या वाहतुकीवर झाला आहे.
  • प्रवासी संख्या रोडावल्याने मध्य रेल्वेने सुमारे १० प्रवासी गाड्या १० मेपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईः राज्यात करोनाचा (Coronavirus) उद्रेक झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने राज्यात १ मे पर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. या स्थितीचा परिणाम मुंबई बाहेर जाणाऱ्या आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमधून मुंबईत येणाऱ्या ट्रेनच्या वाहतुकीवर झाला आहे. प्रवासी संख्या रोडावल्याने मध्य रेल्वेने (Central Railway) सुमारे १० प्रवासी गाड्या १० मेपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (10 trains from mumbai pune to other cities in the state canceled)

मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, अजनी-मुंबई हमसफर/ दुरंतो एक्स्प्रेस, नागपूर- पुणे, दादर-शिर्डी साईनगर एक्स्प्रेस अशा गाड्या रद्द करण्यात आल्यात. करोनामुळे प्रवासीसंख्या नगण्या झाल्याने या ट्रेनना नुकसान होत आहे. म्हणूनच रेल्वेने या ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतला. ही माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

क्लिक करा आणि वाचा- पुर्नवसन केंद्रात मुलीचा लैंगिक छळ, काळजीवाहकाला अटक

खालील विशेष रेल्वेगाड्या कमी प्रतिसादामुळे रद्द करण्यात आल्या आहेत.

१).ट्रेन क्रमांक ०२१०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मनमाड विशेष
या ट्रेनच्या फे-या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२२१ पर्यंत रद्द

२) ट्रेन क्रमांक ०२११० मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२२१ पर्यंत रद्द

३) ट्रेन क्रमांक ०२११३ पुणे-नागपूर विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २८ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२१ पर्यंत रद्द

४) ट्रेन क्रमांक ०२११४ नागपूर-पुणे विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक ९ मे २०२१ पर्यंत रद्द

५) ट्रेन क्रमांक ०२१८९ मुंबई-नागपूर विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २८ एप्रिल २०२१ पासून दिनांक ११ मे २०२१ पर्यंत रद्द

६) ट्रेन क्रमांक ०२१९० नागपूर -मुंबई विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२१ पर्यंत रद्द

७) ट्रेन क्रमांक ०२१११ मुंबई-अमरावती विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २८ एप्रिल २०२१ पासून दिनांक ११ मे २०२१ पर्यंत रद्द

८) ट्रेन क्रमांक ०२११२ अमरावती-मुंबई विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२१ पर्यंत रद्द

९) ट्रेन क्रमांक ०२२७१ मुंबई-जालना विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २७ एप्रिल २०२१ पासून दिनांक १० मे २०२१ पर्यंत रद्द

१०) ट्रेन क्रमांक ०२२७२ जालना-मुंबई विशेष
या ट्रेनच्या फेऱ्या दिनांक २८ एप्रिल २०२१ पासून दिनांक ११ मे २०२१ पर्यंत रद्द

क्लिक करा आणि वाचा- कोल्हापूर: पाण्याचा टँक स्वच्छ करताना तीन कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू
क्लिक करा आणि वाचा- मोठा दिलासा! रोजच्या करोना रुग्णसंख्येत मोठी घट, आज ४८,७०० नव्या रुग्ण, ७१ हजारांवर झाले बरे

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/10-trains-from-mumbai-pune-to-other-cities-in-the-state-canceled/articleshow/82263816.cms