मुंबई बातम्या

Mumbai Weather Alert : मुंबईसाठी पुढचे ४ तास धोक्याचे, ‘या’ शहरांना रेड अलर्ट जारी – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • मुंबईसाठी पुढचे ४ तास धोक्याचे
  • ‘या’ शहरांना रेड अलर्ट जारी
  • मुंबईत कुठे आणि किती पाऊस पडला?

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पावसाने पुन्हा एकदा कहर माजवला आहे. मुंबईतील अनेक भागात 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. नालासोपारा, सायन या रेल्वे स्थानकांचे रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्यात गेले आहेत. पालघरच्या साफाले नंदाडे भागात घरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. इतकंच नाहीतर इथे लोकांना छतावर उभे राहण्याची वेळ आली आहे. येथून ८० जणांना वाचविण्यात आले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तास मुंबई, पालघर आणि डहाणूमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यावेळी सोसाट्याचा वाराही पसरेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पुढील ४ तास अतिशय धोक्याचे

हवामान खात्याने मुंबई शहर व उपनगरी भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील तीन ते चार तासांत अनेक ठिकाणी गडगडाटासह, विजांचा कडकडाट व जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. आधीच मुंबईत पावसामुळे हाहाकार झाला असून धोका आणखी वाढणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. येत्या २४ तासात मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
‘राज ठाकरे आश्वासक चेहरा पण…’, चंद्रकांत पाटलांचं मनसे युतीबाबत मोठं विधान
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते व रेल्वेमार्गावर परिणाम होईल अशी शक्यता आहे. स्थानिक सेवेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, भरतीची तीव्रता वाढल्यामुळे शहरातही पाणी साचण्याच्या समस्या वाढू शकतात. समुद्रामध्ये भरती जास्त असल्याने रस्त्यांमधून पाणी रिकामी करण्यातही अडचणी येतील.

मुंबईत कुठे आणि किती पाऊस पडला?

मुंबईत १७ जुलै रोजी पहाटे १८ जुलैच्या मध्यरात्री ३:३० वाजेपर्यंत सांताक्रूझ क्षेत्र २१७.५ मिमी, कुलाबा १७८.० मिमी, महालक्ष्मी १५४.५ मिमी, वांद्रे २०२.० मिमी, जुहू विमानतळ १९७.५ मिमी, राम मंदिर 171.5 मिमी, मीरा रोड २०४.० मिमी दहिसर २४९.५ मिमी, भाईंदर १७८.५ मिमी पावसाने हजेरी लावली.
imageमुंबईच्या पावसाने घेतला २२ जणांचा बळी, चेंबूर आणि विक्रोळीमध्ये मोठ्या दुर्घटना

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/rain-alert-by-imd-for-mumbai-palghar-dahanu-heavy-to-very-heavy-rainfall-for-next-24-hours/articleshow/84520045.cms