मुंबई बातम्या

मुंबईत महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार; सहायक पोलीस निरीक्षकावर आरोप – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • मुंबईत महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार
  • पोलीस अधिकाऱ्याविरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार
  • लग्नाच्या भूलथापा देऊन वारंवार केले लैंगिक शोषण

मुंबई: महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलल्याचा दावा देशातील सर्वच राज्य सरकारे करत असतात. पण सर्वसामान्य महिलांचे रक्षण करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यावरच बलात्काराची घटना घडली आहे. मुंबईत ही घटना घडली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली असून, पीडितेने सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील डोंगरी पोलीस ठाण्यात पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीच्या आधारे डोंगरी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलीस निरीक्षकाने लग्नाच्या भूलथापा देऊन अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिला अधिकाऱ्याने केला आहे.

मिलिंद मराठे आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार, लग्नासंबंधी विचारले असता, आरोपीने स्पष्ट शब्दांत नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनंतर डोंगरी पोलिसांनी आरोपी सहायक पोलीस निरीक्षक आणि त्याच्या कुटुंबातील दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पोलीस अधिकारी हा दक्षिण मुंबईतील एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे, अशी माहिती मिळते. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

imagePune Crime: पुणेकरांनो सावधान; तुमचा कोविड चाचणी अहवाल बनावट तर नाही ना!

Source: https://maharashtratimes.com/crime-news/mumbai-api-booked-for-raping-woman-police-officer-on-pretext-of-marriage-in-dongri-area/articleshow/82126038.cms