मुंबई बातम्या

‘मुंबई संस्कृती संगीत महोत्सवा’चे ऑनलाइन आयोजन – Loksatta

१० एप्रिलपासून दर शनिवारी सायंकाळी ७ वाजता मैफल

मुंबई : ‘द इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबई’ व ‘महाराष्ट्र पर्यटन संचालनालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील पदवीदान सभागृहात २९व्या ‘मुंबई संस्कृती संगीत महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. संगीतरसिकांना १० एप्रिल ते १ मे या काळात दर शनिवारी संध्याकाळी ७ वाजता आभासी पद्धतीने (ऑनलाइन) महोत्सवात सहभागी होता येईल. महोत्सवात पं. शिवकुमार शर्मा, राधिका सूद नायक, उस्ताद फझल कुरेशी, अश्विनी भिडे-देशपांडे हे कलाकार सहभागी होणार आहेत.

‘द इंडियन हेरिटेज सोसायटी, मुंबई’तर्फे  १९९२ पासून भारतीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. पूर्वी हा महोत्सव बाणगंगा तलावाच्या काठी ‘बाणगंगा महोत्सव’ नावाने होत असे. मात्र ध्वनिप्रदूषणाच्या कारणास्तव उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सोहळ्याचे ठिकाण बदलण्यात आले. त्यानंतर ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या पायऱ्यांवर हा महोत्सव साजरा होतो. महोत्सवाचे नाव बदलून ‘मुंबई संस्कृती’ असे ठेवण्यात आले. यावर्षी ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर प्रथमच ‘मुंबई संस्कृती महोत्सव’चे आभासी स्वरूपात होणार आहे.  या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण संगीतप्रेमींना  www.Youtube.com/IndianHeritageSocietyMumbai  या यूटय़ूब वाहिनीवर  पाहता येईल. १० एप्रिलला  पं.  शर्मा यांच्या संतूर वादनाचा कार्यक्रम झाला. शनिवार, १७ एप्रिलला सुफी संगीत गायिका राधिका सूद  नायक यांची मैफल होईल. तर २४ एप्रिलला उस्ताद फझल कु रेशी यांचे तबला वादन होईल. १ मे रोजी अश्विनी भिडे-देशपांडे यांचे गायन होईल. लिंक- ihsmumbai.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 16, 2021 1:33 am

Web Title: virtual music concert of mumbai sanskriti festival zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/virtual-music-concert-of-mumbai-sanskriti-festival-zws-70-2445876/