मुंबई बातम्या

मुंबई पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट, 362 गुन्हेगारांच्या तपासणीसह 22 जण अटकेत – Sakal

मुंबईः मुंबई पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी ऑपरेशन ऑल आऊट राबवले असून त्यात मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत 362 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच 22 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत 53 प्रकरणं दाखल करण्यत आली आहे.

गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात सक्रिय मोहिम राबविण्यासाठी मुंबई
पोलिसांनी 4 डिसेंबरच्या मध्यरात्री सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन केले. सह पोलिस आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था ) विश्वास नांगरे पाटील आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व मुंबई पोलिस ठाण्यात ही कारवाई पार पाडली. सर्व 5 प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त पोलिस आयुक्त, सर्व 13 परिमंडळ विभागांचे पोलिस उपायुक्त, सर्व विभागांचे सहाय्यक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहिले आणि त्यांनी
ऑपरेशनचे वैयक्तिक निरीक्षण केले. 

प्रत्येक पोलिस ठाण्यांमधून जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. प्रत्येक कार्य करण्यासाठी समर्पित वैयक्तिक टीमसह अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी, संशयास्पद व्यक्ती आणि क्रियांसाठी हॉटेल्स, लॉजेस आणि मुसाफिरखानांची तपासणी, संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू जसे की शस्त्रे, ड्रग्स, इ. म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तू, शोधण्यासाठी नाकाबंदीचे आणि कोम्बिंग ऑपेरशनचे आयोजन, फरार आणि पाहिजे व्यक्तींना अटक करणे, प्रलंबित अजामीनपात्र वारंट आणि स्थायी वारंटची बजावणी, अवैध दारू, जुगार इत्यादी अशा बेकायदेशीर क्रियांवर कारवाई, पोलिस दृश्यमानता वाढविण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि संवेदनशील भागात पायी गस्त ही कामे या ऑपरेशन अंतर्गत हाती घेण्यात आली होती.

अधिक वाचा-  मुंबई महानगरात विना सिग्नल रिंगरूट, 2030 मध्ये रिंगरूट प्रत्यक्षात येणार

 

  • ऑल आऊट ऑपरेशन अंतर्गत करण्यात आलेले कारवाई
  • गंभीर गुन्हयातील अभिलेखावरील 362 गुन्हेगार तपासणी.
  • 22बाहय गुन्हेगार आढळून आले आणि त्यांना अटक केली.
  • ड्रग्स-एन.डी.पी.एस कायदयाअंतर्गत 53 प्रकरणे, ज्यात 4 प्रकरणे ड्रग्स सेवन संदर्भात
  • आहेत. ड्रग्स जसे एम.डी.एम.ए, गांजा, जप्त केले.
  • 851 हॉटेल्स, लॉज, मुसाफिरखाना तपासले.
  • 861 ठिकाणी नाकाबंदी दरम्यान सात हजार 562  वाहनांची तपासणी केली.
  • 189  ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले.
  • एक अवैध अग्नीशस्त्र, 11 धारदार शस्त्रे (सुरी, तलवार इ.) जप्त केले.
  • 48 फरार आणि पाहिजे आरोपीतांना अटक करण्यात आली.
  • 167 अजामीनपात्र वारंट ची बजावणी केली.
  • अवैध कृती विरोधात 95 छापे, अटक आणि जप्ती करण्यात आली.
  • 428 महत्वाच्या ठिकाणी पायी गस्त आयोजीत करण्यात आली.

———————————–

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai police operation all out investigation of 362 criminals arrest of 22 criminals

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-police-operation-all-out-investigation-362-criminals-arrest-22-criminals-381921