मुंबई बातम्या

बॉम्बे जिमखाना रोडच्या रुंदीकरणासाठी पालिकेला ग्रीन सिग्नल – मुंबई लाइव्ह

फॅशन स्ट्रीट आणि CSMTला जोडणारा हजारीमल सोमानी रोड रुंदीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

राज्याच्या नगरविकास विभागानं मंजूर केलेल्या ३४९ प्रस्तावांपैकी हा एक आहे. पालिकेनं सप्टेंबर २०१८ पासून अंमलात आलेल्या नवीन विकास योजनेचा (DP) ‘वगळलेला भाग’ म्हणून हा प्रस्ताव पाठवण्यात आला.

या नवीन रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावामुळे राज्यातून पुढे जाण्याची शक्यता आहे की, मुंबई जिमखान्याला रुंदीकरणासाठी काही जमीन सोडावी लागेल. सध्याचा रस्ता अंदाजे ६० फूट रुंद आहे, तर तो आता ८० फूट रुंद करण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

हे लक्षात घेण्यासारखं आहे की, २०१६ मध्ये ही योजना पहिल्यांदाच तयार केली गेली होती. परंतु पालिका आणि जिमखान्याच्या व्यवस्थापनादरम्यान कायदेशीर भांडण झाल्यामुळे ही योजना कागदावर होती.

गेल्या काही वर्षांत महापालिकेनं शहरातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला COVID 19 लॉकडाऊन दरम्यान त्याच्या योजनांना मोठा धक्का बसला असला तरी, पालिका प्रलंबित प्रकल्पांना वेग देण्याचा विचार करत आहे.


हेही वाचा

Source: https://www.mumbailive.com/mr/infrastructure/bmc-receives-confirmation-for-the-widening-of-bombay-gymkhana-road-58408