मुंबई बातम्या

रूईच्या कन्येचा मुंबईत कोरोना विरुद्ध असा लढा… – Sakal

इचलकरंजी – हातकणंगले तालुक्यातील रूई येथील मुजावर कुटुंबातील शौकत मुजावर यांची कन्या डॉ.लुबना ही मुंबई येथील सावित्रीबाई ज्योतिबा फुले प्रसुतिगृह भांडुप, मुंबई येथे स्त्रीरोग तज्ञ म्हणून सेवेत आहेत.

सेवा बजावताना त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह महिला रूग्णांची प्रसूती देखील केली आहे. दररोज 150 ते 200 हुन अधिक महिला रूग्णांची तपासणी करणे तसेच महिला रूग्णांची सेवा करणे हे कार्य समर्थपणे करत आहेत.

वाचा – दिडशे वर्षांनंतर रायगडावरील हत्ती तलाव यंदा भरला काठोकाठ ; कशी घडली ही किमया ?

या दरम्यान डॉ.लुबना मुजावर यांनी स्वतः दोन वेळा स्वॅब तपासणी करून अहवाल निगेटिव्ह आले.तसेच त्या होम क्वांरटाईन देखील झाल्या. तसेच या सुमारे चार महिन्यां पासून आपली सेवा बजावत असताना कुंटुबांची संपर्क न ठेवता आपले सेवा कार्य अविवरत करत आहेत.

कोरोनाच्या महामारी संकट काळात निरोगी आयुष्य देण्यासाठी सेवा  बजावणार्‍या कोरोना योद्धांचे रूई परिसरातून कौतुक होत आहे.या सेवेत कुटुंबांकडुन खंबीर साथ मिळत आहे.

संपादन – मतीन शेख

Source: https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/dr-lubna-kolhapur-serving-gynecologist-mumbai-serving-corona