मुंबई बातम्या

तीन अधिकाऱ्यांना अवमान नोटीस – Maharashtra Times

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर

वेतन आयोगाचे लाभ देण्यास हयगय करणाऱ्या तीन वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवमान नोटीस बजावली आहे.

चंद्रपूर महापालिकेच्या आरोग्य विभागात परिचारिका पदावर काम करणाऱ्या शशिकला रायपुरे आणि इतर आठ जणांना निवृत्तीनंतर वेतन आयोगाचे लाभ मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगचे लाभ तीन महिन्यात द्यावेत, असा आदेश १४ नोव्हेंबर २०१९ रोजी दिला. परंत त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे निवृत्त परिचारिकांनी हायकोर्टात अवमान याचिका दाखल केली. त्यावर न्या. अतुल चांदूरकर आणि न्या. नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव , केंद्रीय आरोग्य विभागाच्या सहसचिव गायत्री मिश्रा आणि चंद्रपूर महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांच्यावर अवमान कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली आहे. त्यावर सहा आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/bombay-high-court-nagpur-bench-has-issued-contempt-notice-to-three-officers-of-pay-commission/articleshow/78707487.cms