मुंबई बातम्या

Rain updates : मुंबई-ठाण्यासह उपनगरांत पहाटे जोरदार पाऊस , तीन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट – Times Now Marathi

मुंबई-ठाण्यासह उपनगरांत पहाटेपासून पावसाची बॅटिंग&  | & फोटो सौजन्य:&nbspANI

थोडं पण कामाचं

  • मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह उपनगरांमध्ये १४ ऑगस्टच्या पहाटेपासून जोरदार पाऊस  (Heavy Rain) कोसळतो आहे.
  • पालघर, उत्तर मुंबई, कोकण  किनारपट्टी (mumbai, thane, palghar) भाग तसेच दक्षिण मध्य मुंबईत ढगाळ वातावरण सकाळी निर्माण झाले.
  • . येत्या २४ तासांत पालघर आणि कोकण किनारपट्टीसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.

मुंबई : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह उपनगरांमध्ये १४ ऑगस्टच्या पहाटेपासून जोरदार पाऊस  (Heavy Rain) कोसळतो आहे.   पालघर, उत्तर मुंबई, कोकण  किनारपट्टी (mumbai, thane, palghar) भाग तसेच दक्षिण मध्य मुंबईत ढगाळ वातावरण सकाळी निर्माण झाले.  काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. येत्या २४ तासांत पालघर आणि कोकण किनारपट्टीसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत अति मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे.

कोकण आणि मराठवाड्यातील अंदाज 

 कोकणातील पावसाबाबत बोलायचे झाले तर गुरुवारी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. कोकण किनारपट्टीच्या भाात येत्या चार दिवस जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज  हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये १५ आणि १६ ऑगस्टला वरूणराजा थोडा मेहरबान होण्याची शक्यता आहे. या भागात  पावसाच्या तुरळक-हलक्या सरी तर मराठवाड्यातील  काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

मुंबईतील पाऊस 

मुंबईत गुरूवारी सकाळपर्यंत ७० ते १०० मिलीमीटर पाऊस रेकॉर्ड करण्यात आला. मुंबईसह उपनगरांत संध्याकाळी पावसाने चांगला जोर धरला होता. त्यानंतर अधून-मधून पावसाच्या सरी बरसत होत्या. मुंबईतील विविध भागातील मुंबई महापालिकेने १३ ऑगस्टच्या रात्री ८ ते १४ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंतचा सरासरी पाऊस पुढील प्रमाणे 

  1. मुंबई शहर – २६.६२ मिलीमीटर पाऊस 
  2. पूर्व उपनगर – ३८. ६६ मिलीमीटर पाऊस 
  3. पश्चिम उपनगर – ३४. ८६ मिलीमीटर पाऊस 

 शुक्रवार पहाटेबद्दल बोलायचे झाले  पावसानं मुंबईला झोडपलं आहे. मुंबई-ठाण्यासह अनेक उपनगरांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोर धरला आहे.  अजून पावसाचा जोर कायम आहे. 

आजचा मुंबईतील पावसाचा अंदाज 

आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्य आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.  या खेरीज जोराचा वारा सुटण्याची शक्यता आहे. याचा ताशी वेग ४५ ते ५५ किलोमीटर असण्याची शक्यता आहे. हा वेग ताशी  ६०  किलोमीटर जाण्याची शक्यता आहे. 

आजचे भरती ओहटीचे वेळापत्रक 

  1. भरती – सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी – ३.३५  मीटरची लाट 
  2. ओहटी –  दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी – २.४४ मीटरची लाट 
  3. भरती -सायंकाळी ७ वाजून २४ मिनिटांनी – ३.०१  मीटरची लाट 
  4. ओहटी ( १५ ऑगस्ट)  –  पहाटे २ वाजून २० मिनिटांनी – १.४० मीटरची लाट

ठाणे, रायगड आणि पालघर या तीन जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. या तीनही जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत घाटमाथ्यावर जोरदार पावसाची पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/mumbai-and-rest-of-the-maharashtra-weather-updates-heavy-rainfall-in-mumbai-thane-palghar-district-imd-forecast/307724