मुंबई बातम्या

LIVE UPDATES | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शरदाताई टोपे यांचं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने – ABP Majha

कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु-मुख्यमंत्री
कार आणि सरकार दोन्हीही व्यवस्थित सुरु आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती? पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या राज्य सरकारबद्दल ज्यावेळी चर्चा होते. त्यावेळी नेहमी या सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हाती आहे, याबाबत सर्वाधिक चर्चा रंगलेल्या दिसतात. तुम्हाला काय वाटतं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, कार आणि सरकार दोन्हीही सुरळीत सुरु आहे. आम्ही सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. सर्वजण मिळून काम करत आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय
मुंबई : सर्वसामान्य गरीब माणसाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई महानगर वगळता मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी व त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी स्ट्रेस फंड उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या स्ट्रेस फंडच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील पुनर्वसन सदनिकांच्या बांधकामासाठी बँकांकडून विकासकाला कर्ज उपलब्ध होईल व योजना गतीने पूर्ण होईल. तब्बल पाच वर्षानंतर आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची ही बैठक झाली.

पिंपरी चिंचवड शहरात आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळं मृत्यू 

पिंपरी चिंचवड : शहरात आणखी एका विद्यमान नगरसेवकाचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. जावेद शेख असं त्यांचं नाव असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक होते. 15 जुलै रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेंव्हापासून आकुर्डीतील स्टार या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला, मग पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आज मात्र त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. ते 49 वर्षाचे होते. बकरी ईदच्या आधल्या दिवशी ही दुःखद वार्ता हल्याने कुटुंबियांसह समाजात हळहळ व्यक्त केली जातीये.

Source: https://marathi.abplive.com/news/maharashtra/coronavirus-covid-19-lockdown-unlock-maharahstra-live-updates-795121