मुंबई बातम्या

मुंबईत हॉटस्पॉटची संख्या 241 वर, वरळी कोळीवाडा, पवई, धारावी झोपडपट्टी ‘कोरोना’चे हॉटस्पॉट – TV9 Marathi

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 490 पर्यंत पोहोचली (Corona Hotspot Mumbai) आहे. त्यातील 278 रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळले आहे. गेल्या तीन चार दिवसांमध्ये मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यातील काही रुग्ण हे मुंबईच्या झोपडपट्टीत आढळले आहेत. दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये रुग्ण सापडल्याने मुंबई कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहे. त्यामुळे मुंबईतील हॉटस्पॉटची संख्या 212 वरुन 241 वर पोहोचली आहे.

मुंबईमध्ये कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत  चालला (Corona Hotspot Mumbai) आहे. मुंबईतील झोपडपट्टी भागात रुग्णांची वाढती संख्या सध्या चिंतेचे कारण बनत आहे. वरळी कोळीवाडा, गोवंडी, पवई, घाटकोपर, अंधेरी येथील झोपडपट्टी परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती.

विशेष म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाने शिरकाव केला होता.  धारावीतील एका 56 वर्षीय व्यक्तीचा बुधवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्या घरातील सात जणांना होम क्वारंटाईन केले आहे. तसेच तो राहत असलेली इमारत सील केली आहे.

त्यापाठोपाठ वरळी कोळीवाड्यात राहणाऱ्या मात्र धारावी परिसरात काम करणाऱ्या 52 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. धारावीसारख्या दाटीवाटीने वसलेल्या झोपडीत कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याने मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या धारावी कोरोनाच्या रडारवर आली आहे.

धारावीमधील घरे 10 बाय 10 ची असून प्रत्येक घरांमध्ये सात ते आठ किंवा त्यापेक्षा अधिकजण रहातात. तसेच नेहमीच गर्दी असलेल्या धारावीमध्ये सोशल डिस्टनसिंग कसे राखले जाणार हा प्रश्नच निर्माण झाला आहे. धारावीत आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णामुळे महापालिका आणि राज्य आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले (Corona Hotspot Mumbai) आहे.

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 278 14 19
पुणे (शहर+ग्रामीण) 51 9 2
पिंपरी चिंचवड 20 10
सांगली 25
अहमदनगर 20 1
नागपूर 16 4
कल्याण-डोंबिवली 10
नवी मुंबई* 16 1
ठाणे* 10 1
वसई-विरार* 8 1
पनवेल* 5
पालघर 2 1
यवतमाळ 4 3
बुलडाणा 5 1
सातारा 3
कोल्हापूर 2
उल्हासनगर * 1
गोंदिया 1
औरंगाबाद 3 1
सिंधुदुर्ग 1
नाशिक 1
रत्नागिरी 2
जळगाव 1 1
हिंगोली 1
उस्मानाबाद 2
अमरावती 0 1
वाशिम 1
इतर राज्य (गुजरात) 1
एकूण 489 41 28

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/corona-hotspot-mumbai-increase-241-worli-koliwada-pawai-dharavi-slum-area-corona-hotspot-for-mumbai-202777.html