मुंबई बातम्या

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ बॉम्बे रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय? – ABP Majha

Chhagan Bhujbal : नाशिकमधून (Nashik) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आज सकाळीं बॉम्बे रुग्णालयात (Bombay Hospital) दाखल झाले असून व्हायरल इन्फेक्शनमुळे (Viral Infection) रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आज संध्याकाळीचं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे माहिती आहे. 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे देखील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. असे असताना आज राष्ट्रवादीचे दुसरे नेते छगन भुजबळ याना देखील आज अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना मुंबईच्या (Mumbai) बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ते गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमात मास्क वापरत असल्याचे दिसून येत होते. आज अस्वस्थ वाटू लागल्याने तसेच  दिवसांपासून व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आज संध्याकाळीचं रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharged) मिळणार असल्याचे माहिती आहे. 

छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमापासून ते मास्क वापरात आहेत. त्यानंतरच्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्या कार्यक्रमांत त्यांनी मास्क वापरत होते. निफाड (Niphad) तालुक्यातील कर्मवीर काकासाहेब वाघ साखर कारखान्याच्या 40 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी भुजबळ यांनी एकमेव मास्क लावलेला होता. छगन भुजबळ यांचा 75 वा वाढदिवसा दरम्यान भुजबळ यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्या दरम्यान अनेकांच्या भुजबळ संपर्कात आल्याने आठ ते दहा दिवस भुजबळ आजारी होते. त्यावेळी देखील भुजबळ काही दिवस मुंबईत उपचार घेत होते.

दरम्यान छगन भुजबळ यांच्या जनसंपर्क विभागाशी संवाद साधला असता, त्यांच्यामते भुजबळ हे मुंबई दौऱ्यावर आहेत. कधी नाशिक तर मुंबई जाणे येणे असते. त्यामुळे विशेष असे काही नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयात (Mumbai Bombay Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

REELS

सिडकोबाबत भुजबळांचे पत्र 
नाशिक येथील सिडकोचे कार्यालय औरंगाबाद येथे गेल्याने नाशिकच्या सिडको (Nashik Cidco) वसाहतीतील नागरिकांना कागदपत्रांच्या कामकाजासाठी नाहक औरंगाबादला चकरा माराव्या लागतील. त्यामुळे  सिडकोवासियांसाठी असलेला हा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घेऊन नाशिक येथील सिडकोचे कार्यालय पूर्ववत सुरु ठेवा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे पत्राद्वारे  केली आहे. 

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiiAFodHRwczovL21hcmF0aGkuYWJwbGl2ZS5jb20vbmV3cy9tYWhhcmFzaHRyYS9tYWhhcmFzaHRyYS1uZXdzLW5hc2hpay1uZXdzLW5jcC1sZWFkZXItY2hoYWdhbi1iaHVqYmFsLWFkbWl0dGVkLXRvLWJvbWJheS1ob3NwaXRhbC0xMTE4Mjg10gEA?oc=5