मुंबई बातम्या

गरज नसेल तर कोर्टात येऊ नका; करोनाच्या पार्श्वभूमीवर नोटीस – Maharashtra Times

गरज नसेल तर कोर्टात येऊ नका; करोनाच्या पार्श्वभूमीवर नोटीस
मुंबई: अत्यावश्यक असेल तरच उच्च न्यायालयात या, अन्यथा कोर्टात येऊ नका, अशी नोटीसच उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांनी काढली आहे. करोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

अत्यावश्यक असेल तरच न्यायालयाच्या आवारांत प्रवेश करा आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा’, अशी राज्यभरातील सर्व पक्षकार, वकील व सर्वसामान्य नागरिकांना रजिस्ट्रार जनरल यांनी ही सूचना केली आहे.

मुंबईसह राज्यात करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर बॉम्बे बार असोसिएशनने आवश्यकता असेल तरच पक्षकारांनी न्यायालयात यावे, अशा सूचना द्याव्यात, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली होती. राज्यात करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर सर्व स्तरांवर खबरदारी घेतली जात आहे. बॉम्बे बार असोसिएशननंही सदस्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसंच मुंबई उच्च न्यायालय प्रशासनालाही विनंती केली आहे. सुरक्षेसाठी तैनात पोलिसांना ‘टेम्परेचर गन’ पुरवण्यात यावेत, स्वतः खटला लढणाऱ्या पक्षकारांचे खटले गैरहजेरीमुळं निकाली निघणार नाहीत, असा आदेश काढावा, अशी विनंती बीबीएनं प्रशासनाला केली होती. या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या रजिस्ट्रार जनरलने आज ही नोटीस जारी केली आहे. त्यात विनाकारण कोर्टात गर्दी करू नका, अत्यावश्यक असेल तरच कोर्टात या, अशा सूचना केल्या आहेत.

राज्यातील करोना रुग्णांची संख्या

>> मुंबई: ४

>> पुणे: १०

>> ठाणे: १

>> नागपूर:३

मुंबई-पुण्यात सिनेमा-नाट्यगृहे मध्यरात्रीपासून बंद

करोनाबाबत अफवा पसरवाल तर कारवाई

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/coronavirus-bombay-hc-issues-notice-asks-litigants-to-not-crowd-court-premises/articleshow/74615056.cms