मुंबई बातम्या

मुंबईत आता ‘हो – हो’ बस सेवा; पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण – Pudhari

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘हो हो’ बस सेवा सुरु करण्यात आली आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या दुमजली बसचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

मुंबई हे देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मुंबईत या पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर ‘हो हो’ बसची सुविधा सुरु करण्यात आली आहे. आगामी कालावधीत ११ ‘हो हो’ बस राज्यभरात सुरू करण्यात येणार आहे. या बसच्या आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. ‘बुक माय शो’ या ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनीची मदत घेतली जाणार आहे.. या बसचे आरक्षण दर कमी असेल.

ही बस सेवा मुंबईमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमार्फत मुंबईतील महत्वाच्या पर्यटन स्थळी ही बस जाईल. आगामी सहा महिन्याच्या कालावधीत राज्यात ‘हो हो’ बसेस पर्यटनस्थळी देण्यात येतील अशी माहितीही लोढा यांनी दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि एच आर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने युवा पर्यटन संघ स्थापन करण्यात आला आहे. या उपक्रमात पर्यटन विषयक शिक्षण घेणारे २० विद्यार्थी सहभागी झाले होते. पर्यटनातील विविध संधी आणि पर्यटन स्थळांची या पर्यटन विषयक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यटन महामंडळाशी संलग्न झाल्यामुळे फायदा होईल, असा विश्वासही लोढा यांनी व्यक्त केला.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihQRodHRwczovL3B1ZGhhcmkubmV3cy9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWkvNDQyMTk4LyVFMCVBNCVBRSVFMCVBNSU4MSVFMCVBNCU4MiVFMCVBNCVBQyVFMCVBNCU4OCVFMCVBNCVBNC0lRTAlQTQlODYlRTAlQTQlQTQlRTAlQTQlQkUtJUUwJUE0JUI5JUUwJUE1JThCLSVFMCVBNCVCOSVFMCVBNSU4Qi0lRTAlQTQlQUMlRTAlQTQlQjgtJUUwJUE0JUI4JUUwJUE1JTg3JUUwJUE0JUI1JUUwJUE0JUJFLSVFMCVBNCVBQSVFMCVBNCVCMCVFMCVBNSU4RCVFMCVBNCVBRiVFMCVBNCU5RiVFMCVBNCVBOCVFMCVBNCVBRSVFMCVBNCU4MiVFMCVBNCVBNCVFMCVBNSU4RCVFMCVBNCVCMCVFMCVBNSU4RCVFMCVBNCVBRiVFMCVBNCVCRSVFMCVBNCU4MiVFMCVBNCU5QSVFMCVBNSU4RCVFMCVBNCVBRiVFMCVBNCVCRS0lRTAlQTQlQjklRTAlQTQlQjglRTAlQTUlOEQlRTAlQTQlQTQlRTAlQTUlODctJUUwJUE0JUIyJUUwJUE1JThCJUUwJUE0JTk1JUUwJUE0JUJFJUUwJUE0JUIwJUUwJUE1JThEJUUwJUE0JUFBJUUwJUE0JUEzL2Fy0gGFBGh0dHBzOi8vcHVkaGFyaS5uZXdzL21haGFyYXNodHJhL211bWJhaS80NDIxOTgvJUUwJUE0JUFFJUUwJUE1JTgxJUUwJUE0JTgyJUUwJUE0JUFDJUUwJUE0JTg4JUUwJUE0JUE0LSVFMCVBNCU4NiVFMCVBNCVBNCVFMCVBNCVCRS0lRTAlQTQlQjklRTAlQTUlOEItJUUwJUE0JUI5JUUwJUE1JThCLSVFMCVBNCVBQyVFMCVBNCVCOC0lRTAlQTQlQjglRTAlQTUlODclRTAlQTQlQjUlRTAlQTQlQkUtJUUwJUE0JUFBJUUwJUE0JUIwJUUwJUE1JThEJUUwJUE0JUFGJUUwJUE0JTlGJUUwJUE0JUE4JUUwJUE0JUFFJUUwJUE0JTgyJUUwJUE0JUE0JUUwJUE1JThEJUUwJUE0JUIwJUUwJUE1JThEJUUwJUE0JUFGJUUwJUE0JUJFJUUwJUE0JTgyJUUwJUE0JTlBJUUwJUE1JThEJUUwJUE0JUFGJUUwJUE0JUJFLSVFMCVBNCVCOSVFMCVBNCVCOCVFMCVBNSU4RCVFMCVBNCVBNCVFMCVBNSU4Ny0lRTAlQTQlQjIlRTAlQTUlOEIlRTAlQTQlOTUlRTAlQTQlQkUlRTAlQTQlQjAlRTAlQTUlOEQlRTAlQTQlQUElRTAlQTQlQTMvYXI?oc=5