मुंबई बातम्या

मुंबई पोलिस कोरोनाच्या विळख्यात, गेल्या 24 तासांत 28 कर्मचारी पॉझिटिव्ह | Mumbai Police – Sakal

महाराष्ट्र
sakal_logo

By

मुंबई : मुंबईत कोरोना (corona) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. अशात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होतेय. मुंबई पोलीस दलही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत त्यांच्या 28 कर्मचार्‍यांची कोविड-19 (covid19) साठी चाचणी पॉझिटिव्ह आली असून, या दलातील सक्रिय प्रकरणांची संख्या 1,273 वर पोहोचली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव पोलीस दलावरही

मुंबईसह (Mumbai Corona Cases) राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध आणि संचारबंदी लागू करण्यात आली. कोरोना वॉरीअर्स असलेलं पोलीस दल (Mumbai Police) रस्त्यावर उभे राहून आपली सेवा देतंय. पण पोलीस देखील कोरोनाच्या विळख्यात सापडलेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (corona third wave) प्रभाव पोलीस दलावरही दिसू लागलाय.

हेही वाचा: कोरोनाचा संसर्ग वेगाने, चाचण्या वाढवा; केंद्राचे राज्यांना निर्देश

आतापर्यंत एकूण 127 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबईत मागील 24 तासात 28 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आतापर्यंत एकूण 10,666 पोलिस पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मुंबई पोलिस दलातले आतापर्यंत एकूण 127 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.1,273 सक्रिय रुग्ण अद्याप पोलिस खात्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Source: https://www.esakal.com/maharashtra/mumbai-police-corona-positive-marathi-news-jpd93