मुंबई बातम्या

शिंदे गट, भाजप नेते पहिल्यांदाच मोर्चात एकत्र, मुंबईत लव्ह जिहाद विरोधात एल्गार; नजर जाईल तिथे भगवे… – TV9 Marathi

मोर्चेकऱ्यांच्या हातात भूमी रक्षा, राष्ट्र सुरक्षा असं लिहिलेले फलक दिसत आहेत. गळ्यात भगवा गमछा, डोक्यावर भगवी टोपी घालून मोर्चेकरी आले आहेत. तसेच अनेकांच्या हातात भगवे पताके आहेत.

hindu jan akrosh morcha

Image Credit source: tv9 marathi

विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: सकल हिंदू समाजाने आज मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातून या मोर्चाची सुरूवात झाली आहे. परळच्या कामगार मैदानावर या मोर्चाची सांगता होणार आहे. हातात भगवे झेंडे घेऊन हजारो लोक रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे नजर जाईल तिथे भगवे झेंडेच झेंडे दिसत आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसर भगवामय झाला आहे. मुंबईत जणू भगवे वादळ आवतरल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे या मोर्चात पहिल्यांदाच शिंदे गट आणि भाजपचे नेते एकत्र आले आहेत. दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित मोर्चात उतरल्याने महापालिका निवडणुकीसाठी हे नेते वातावरण ढवळून काढत असल्याची चर्चा सुरू आहे.

[embedded content]

आज सकाळी 10 वाजल्यापासून या हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, धर्मांतर विरोधी कायदा लागू करा आणि श्रद्धा वालकरच्या मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा द्या या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. हातात भगवे झेंडे, अंगात भगवे कपडे घालून हजारो लोक शिवाजी पार्कात एकवटले आहेत.

जो हिंदू हित का काम करेगा

मोर्चेकऱ्यांच्या हातात भूमी रक्षा, राष्ट्र सुरक्षा असं लिहिलेले फलक दिसत आहेत. गळ्यात भगवा गमछा, डोक्यावर भगवी टोपी घालून मोर्चेकरी आले आहेत. तसेच अनेकांच्या हातात भगवे पताके आहेत. या मोर्चात वंदे मातरम, जय श्रीराम आणि जो हिंदू हित का काम करेगा, वही देश पे राज करेगा अशा घोषणा देण्यात येत आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून गेला आहे.

भाजपसोबत शिंदे गटही मोर्चात

या मोर्चात भाजप नेते आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, किरीट सोमय्या, चित्रा वाघ, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि केशव उपाध्ये या मोर्चात सामील झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

या मोर्चात शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे, किरण पावसकर आणि सदा सरवणकरही सहभागी झाले आहेत. पहिल्यांदाच मुंबईतील मोर्चात शिंदे गट आणि भाजप नेते एकत्रित रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे या मोर्चाचं महापालिका निवडणुकीशी कनेक्शन जोडलं जात आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMifGh0dHBzOi8vd3d3LnR2OW1hcmF0aGkuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS9oaW5kdS1qYW4tYWtyb3NoLW1vcmNoYS1zdGFydGluZy1hZ2FpbnN0LWxvdmUtamloYWQtaW4tbXVtYmFpLWF1MjktODYyMzk3Lmh0bWzSAYABaHR0cHM6Ly93d3cudHY5bWFyYXRoaS5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpL2hpbmR1LWphbi1ha3Jvc2gtbW9yY2hhLXN0YXJ0aW5nLWFnYWluc3QtbG92ZS1qaWhhZC1pbi1tdW1iYWktYXUyOS04NjIzOTcuaHRtbC9hbXA?oc=5