मुंबई बातम्या

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ दोन दिवशी पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद – Zee २४ तास

BMC Water Cut In Mumbai :  मुंबईकरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण मुंबई शहरामध्ये पाण्याचा मेगाब्लॉक (Water Cut in Mumbai) असणार आहे. मुंबईकरांना दोन दिवस पाणीकपातीचा (Mumbai Water Supply) सामना करावा लागणार आहे. 30 आणि 31 जानेवारीला मुंबईतील काही भागात नळांना पाणी येणार नाही आहे. त्यामुळे या तारख्या लक्षात ठेवा अन्यथा वेळेवर तुमची तारांबळ उडेल. या दोन तारखेला 24 तास तासांसाठी पाणी येणार नाही आहे. 

पाण्याचा ‘मेगाब्लॉक’!

मुंबई पालिकेकडून सांगण्यात आलं आहे की, भांडुप संकुलमधील जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनी जोडण्याचं काम केलं जाणार आहे. अतिरिक्त 4,000 मिलिमीटर व्यासाची जी जलवाहिनी ती तोडणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना दोन दिवस पाणीकपातीचं संकट असणार आहे. याशिवाय भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर 2 ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि 2 ठिकाणी उद्भवलेली गळतीबाबत काम केलं जाणार आहे. 

तुम्ही ‘या’ विभागात राहता का?

31 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत काही विभागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने येणार आहे. मुंबईतील नेमक्या कुठल्या विभागात पाणीपुरवठा होणार नाही ते जाणून घेऊयात. (mumbai water cut in 30 january and 31 january and find out in which area water will not come marathi news)

पश्चिम उपनगर 

के पूर्व
के पश्चिम
पी दक्षिण
पी उत्तर
आर दक्षिण
आर मध्य
आर उत्तर
एच पूर्व 
एच पश्चिम 

पूर्व उपनगर

एस विभाग
एन विभाग 
एल विभाग

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMimQFodHRwczovL3plZW5ld3MuaW5kaWEuY29tL21hcmF0aGkvbXVtYmFpL211bWJhaS13YXRlci1jdXQtaW4tMzAtamFudWFyeS1hbmQtMzEtamFudWFyeS1hbmQtZmluZC1vdXQtaW4td2hpY2gtYXJlYS13YXRlci13aWxsLW5vdC1jb21lLW1hcmF0aGktbmV3cy82ODU5ODfSAZ0BaHR0cHM6Ly96ZWVuZXdzLmluZGlhLmNvbS9tYXJhdGhpL211bWJhaS9tdW1iYWktd2F0ZXItY3V0LWluLTMwLWphbnVhcnktYW5kLTMxLWphbnVhcnktYW5kLWZpbmQtb3V0LWluLXdoaWNoLWFyZWEtd2F0ZXItd2lsbC1ub3QtY29tZS1tYXJhdGhpLW5ld3MvNjg1OTg3L2FtcA?oc=5