मुंबई बातम्या

मुंबई विमानतळावर ३६ किलो सोनं सापडलं, असं लपवलं की विश्वास होणार नाही… – Maharashtra Times

मुंबई: मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) सोन्याची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. मंगळवारी डीआरआयने मुंबई विमानताळावरुन तब्बल ३६ किलो सोनं जप्त केलं आहे. या सोन्याची किंमत तब्बल २१ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. तर या तस्करांकडून २० लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. तसेच, सोनं वितळवणाऱ्या एका दुकानदारालाही अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -नर्तिका पुरविण्याच्या बहाण्याने भलताच प्रकार, नगर जिल्ह्यात हे चाललंय काय?

हे तस्करी करुन आणलेलं सोनं कोडवर्डच्या माध्यमातून स्थानिक ऑपरेटर्सला दिलं जाणार असल्याचंही तपासात समोर आलं आहे. या तस्करांनी सोनं लपवण्यासाठी ट्रॅव्हल बॅग, कापड आणि इतर माध्यमांचा वापर केल्याचंही उघड झालं आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आलं आहे.

हेही वाचा -पतीच्या मृत्यूला ९ वर्ष झाली, मग अचानक सोशल मीडियावर एका व्हिडीओत तिला असं काही दिसलं की…

यापूर्वी १८ जानेवारीलाही मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली होती. या प्रवाशांकडून ४.५४ कोटी रुपये किमतीचं ८.२३९ किलोग्राम सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली होती. हे सोनं प्रवाशांनी त्यांच्या अंर्तवस्त्रात लपवलं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे याचा शोध घेणं अत्यंत कठीण झालं होतं.

हेही वाचा -सासुरवाडीला गेलेला वृद्ध पाच दिवसांपासून बेपत्ता, मग गडनदी धरणात मृतदेह आढळल्याने खळबळ

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMivQFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2dvbGQtc211Z2dsaW5nLXJhY2tldC1idXN0ZWQtb24tbXVtYmFpLWludGVybmF0aW9uYWwtYWlycG9ydC1hbmQtc2VpemVkLTM2LWtnLWdvbGQtd29ydGgtcnVwZWVzLTIxLWNyb3JlLWJ5LWRyaS9hcnRpY2xlc2hvdy85NzI4NjQ3MC5jbXPSAcEBaHR0cHM6Ly9tYWhhcmFzaHRyYXRpbWVzLmNvbS9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWktbmV3cy9nb2xkLXNtdWdnbGluZy1yYWNrZXQtYnVzdGVkLW9uLW11bWJhaS1pbnRlcm5hdGlvbmFsLWFpcnBvcnQtYW5kLXNlaXplZC0zNi1rZy1nb2xkLXdvcnRoLXJ1cGVlcy0yMS1jcm9yZS1ieS1kcmkvYW1wX2FydGljbGVzaG93Lzk3Mjg2NDcwLmNtcw?oc=5