मुंबई बातम्या

नवी मुंबई : पहाटेपासून मैदानात किलबिलाट; हजारो विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग – Loksatta

नवी मुंबई महानगर पालिकेने घेतलेल्या चित्रकला स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. शहरात नेरूळ आणि कोपरखैरणे येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत १०६ शाळेतील २ हजार ७९६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा- अंबरनाथ औद्योगिक वसाहतीमधील टाकाऊ रसायनांचे दोन टॅंकर तळोजातील नाल्यात रिते करताना रंगेहाथ पकडले

कोपरखैरानेतील निसर्ग उद्यान रोज सकाळी सकाळी व्यायाम करणाऱ्या मंडळी कडून गजबजलेले असते. आज (बुधवारी) मात्र गजबजाटा ऐवजी किलीबील ऐकू येत होती. याला कारण होते, ते महानगर पालिका आयोजित चित्रकला स्पर्धा. हि स्पर्धा नेरूळ येथील यशवंत राव चव्हाण मैदान आणि कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानात पार पडली. निसर्ग उद्यानात ६७ शाळेतील एक हजार सहाशे सात विद्यार्थांनी सहभाग घेतला तर नेरूळ येथील यशवंत राव चव्हाण मैदानात ३९ शाळेतील एक हजार एकशे एकोणनव्वद विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.

हेही वाचा- नवी मुंबईतील रिओ व रिया अडकले लग्न बंधनात; दोन श्वानांचा अनोखा विवाह

चित्रकला स्पर्धेत एकूण दहा विषय होते पैकी एका विषयावर आधारित चित्र काढण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. यात जी २० जगारिक विश्वगुरु बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल, आझादी का अमृत महोत्सव, सर्जिकल स्ट्राईक, करोना लसीकरण, पंतप्रधान जनयोजना, आत्मनिर्भर भारत, आंतरराष्ट्रीय योग दिन- मोदीजी, चुलीच्या धुरापासून मुक्त महिला- मोदींची संवेदन शिलता, आणि बेटी बचाव बेटी पढाव हे विषय होते.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMikAFodHRwczovL3d3dy5sb2tzYXR0YS5jb20vbmF2aW11bWJhaS9odWdlLXJlc3BvbnNlLXRvLXRoZS1wYWludGluZy1jb21wZXRpdGlvbi1jb25kdWN0ZWQtYnktdGhlLW5hdmktbXVtYmFpLW11bmljaXBhbC1jb3Jwb3JhdGlvbi1kcGotOTEtMzQyMjc5Mi_SAZUBaHR0cHM6Ly93d3cubG9rc2F0dGEuY29tL25hdmltdW1iYWkvaHVnZS1yZXNwb25zZS10by10aGUtcGFpbnRpbmctY29tcGV0aXRpb24tY29uZHVjdGVkLWJ5LXRoZS1uYXZpLW11bWJhaS1tdW5pY2lwYWwtY29ycG9yYXRpb24tZHBqLTkxLTM0MjI3OTIvbGl0ZS8?oc=5