मुंबई बातम्या

इथोपियाचा हायले लेमी मुंबई मॅरेथॉनचा विजेता, तर, भारतीयांमध्ये गोपी टीने जिंकली मॅरेथॉन – Maharashtra Times

मुंबईः हर दिल मुंबई’ नाऱ्यासह दक्षिण मुंबईच्या रस्त्यावर आज टाटा मॅरेथॉन पार पडली आहे. जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेल्या ‘मुंबई मॅरेथॉन’चे यंदा १८वे वर्ष आहे. हायले लेमीने टाटा मुबई पूर्ण मॅरेथॉन जिंकली आहे तर, एलिट भारतीय विजेता गोपी.टी ठरला आहे.

मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला आज सकाळी ५.१५ वाजता सुरुवात झाली. ४२.१९७ किलोमीटरची मॅरेथॉन असून यात ५५ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, दहा किलोमीटर धाव, ड्रीम रन, सीनिअर सिटीझन्स रन आणि चॅम्पियन विथ डिसॅबिलिटी रन आदी विभागांमध्ये मॅरेथॉन पार पडली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मॅरेथॉन स्पर्धेस सुरूवात झाली, तर अर्ध मॅरेथॉन ही माहीम रेती बंदरहून सुरू झाल

वाचाः १४ तारखेला येणारी मकर संक्रांत आता १५ ला का साजरी केली जाते?; वैज्ञानिकांनी सांगितलं कारण

टाटा मुंबई एलिट फुल मॅरेथॉन पुरुष गट विजेत्यांमध्ये इथोपियाचा धावपटू हायले लेमी यांने यंदाची मुंबई मॅरेथॉन स्पर्धा जिंकली आहे. त्याने २ तास ०७ मिनिटं २८ सेंकदात पूर्ण केली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर (केनिया) फिलेमन रोनो, २ तास ८ मिनिटे ४४ सेकंद, तिसऱ्या क्रमांकावर हेलू झेदू इथोपिया २ तास १० मिनिटे २३ सेकंद, अशी विजेत्यांची नावं आहे

वाचाः ‘हर दिल मुंबई’साठी धाव; आज मुंबई मॅरेथॉन, ५५ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग

पोलिसांचा कडक बंदोबस्त

मॅरेथॉनसाठी वाहतुकीच्या नियोजनबरोबरच मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. दक्षिण, मध्य आणि पोलिसांच्या पश्चिम विभागातील स्थानिक पोलिसांबरोबरच ५४० अधिकारी, ३१४५ पोलिस कर्मचारी, राज्य राखीव पोलिसांच्या १८ तुकड्या, चार दंगल पथके, १८ जलद गती दलाची पथके, वाहतूक पोलिस, वॉर्डन तसेच बॉम्बशोधक आणि नाशक पथके असा मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे. याशिवाय मॅरेथॉनच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नजर ठेवण्यात आली, असे पोलिसांनी म्हटले आहे.

वाचाः कॉलेजमध्ये असतानाच करायचे घरफोडी, एका रात्रीत ५ घरात चोरी, पण एक चूक झाली अन्…

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMipAFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2hheWxlLWxlbWktYmVyaGFudS13aW5zLXJhY2UtaW4tcmVjb3JkLXRpbWUtZ29waS10aG9uYWthbC1oaWdoZXN0LXBsYWNlZC1pbmRpYW4tZmluaXNoL2FydGljbGVzaG93Lzk3MDAxOTA3LmNtc9IBqAFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL2hheWxlLWxlbWktYmVyaGFudS13aW5zLXJhY2UtaW4tcmVjb3JkLXRpbWUtZ29waS10aG9uYWthbC1oaWdoZXN0LXBsYWNlZC1pbmRpYW4tZmluaXNoL2FtcF9hcnRpY2xlc2hvdy85NzAwMTkwNy5jbXM?oc=5